writ against mp shivachary on caste validity in high court | Sarkarnama

खासदार शिवाचार्य यांच्या दाखल्यावर "हिंदू लिंगायत' पण; प्रमाणपत्र "बेडा जंगम'चे : न्यायालयात तक्रार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

...

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्‍वर शिवाचार्य यांनी बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याच्या आरोपाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

अपक्ष उमेदवार आणि माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी डॉ. शिवाचार्य यांच्याविरोधात सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. खासदार शिवाचार्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर "हिंदू लिंगायत' असा उल्लेख आहे; तर त्यांनी "बेडा जंगम' जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार केले, असा आरोप याचिकादाराने केला आहे.

संबंधित लेख