कुस्तीगीर राहुल आवारेने 'कोरोना' विरोधात थोपटले दंड - Wrestler Rahul Aware Gives Two Lack Rupees to CM Fund | Politics Marathi News - Sarkarnama

कुस्तीगीर राहुल आवारेने 'कोरोना' विरोधात थोपटले दंड

संपत मोरे
मंगळवार, 31 मार्च 2020

राहुल आवारे सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्यक्तीगत रित्या दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आज सकाळी दिले. राहुल आवारे मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील आहेत. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली आहे

पुणे : राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे यांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी दोन लाखाची वैयक्तिक मदत दिली आहे. आज सकाळी त्यांनी ही रक्कम दिली आहे.

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर मदत करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. राजकीय नेते, कॉर्पोरेट क्षेत्र, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून लोकांना मदत दिली जात आहे. सरकारला उपाययोजना करण्यासाठी निधी दिला जात आहे.

संबंधित लेख