अडकून पडलेले युवक म्हणतात, कोणतीही; तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या.. - Working Youth Worried due to Lock down | Politics Marathi News - Sarkarnama

अडकून पडलेले युवक म्हणतात, कोणतीही; तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

देशभरात लॉक डाउन जाहीर करण्यात आला आला आहे. जीवणावश्यक वस्तू वगळण्यात आल्याचा दावा प्रशासन करते. असे असले तरी सातपूर,अंबडसह जिल्यातील औद्योगिक वसाहतीत काम करणा-या कंत्राटी कामगार, विविध जिल्ह्यांतून शिक्षणासाठी आलेल्या बॅचलर तरुणांचे मात्र मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याचे हाल होत आहेत

नाशिक : देशभरात लॉक डाउन जाहीर करण्यात आला आला आहे. जीवणावश्यक वस्तू वगळण्यात आल्याचा दावा प्रशासन करते. असे असले तरी सातपूर,अंबडसह जिल्यातील औद्योगिक वसाहतीत काम करणा-या कंत्राटी कामगार, विविध जिल्ह्यांतून शिक्षणासाठी आलेल्या बॅचलर तरुणांचे मात्र मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे कोणतीही तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या, अशी विनवणी हे अडकून पडलेले युवक करताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान 22 फेब्रुवारीच्या एक दिवशीय बंद नंतर सर्व परीस्थिती सुरळीत होईल ही अपेक्षा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसासाठी देशभर लोक डाऊनची घोषणा केल्यामुळे औद्योगिक वसाहती मध्ये अडचण झाली आहे. आयटीआय पास होऊन विविध कंपन्या मध्ये शिकाऊ, ठेकेदार, कंत्राटी, रोजदारी कामगार तसेच विविध शाळा. महाविद्यालयात व क्लासेस मध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यां मध्ये मोठ्या प्रमाणावर पोटात भिंतीचा गोळा पोटात उठला आहे.  दिवसेंदिवस मेस व इतर स्वयंपाक करणाऱ्या महिलांनीही डबे बंद केले आहेत. तर काही गावाकडे निघून गेल्यामुळे या वर्गाचे  खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. या बाबत प्रशासनाकडून काय चौकशी अथवा वैद्यकीय तपासणी करायची ती करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या, अशी विनवणी हे युवक करताना पाहायला मिळते आहे.

मी बारामतीचा आहे. 'सिएट' कंपनीत कामाला होतो. कोरोनामुळे कंपनीच बंद झाल्याने रूम मधील पार्टनर स्थानिक असल्याने गावाकडे निघून गेले. मलाही जायचे आहे. माझ्या सारखे हजारो तरूण आशा गंभीर समस्येत अडकले आहेत. प्रशासनाने सहकार्य करावे. -  मनोज कोकरे. 

मी शिदखेडा येथील आहे. दोन महीन्यांपूर्वी शिक्षणा निमित्ताने नाशिकला आलो. शिक्षणाबरोबर मिळेल ते कामही करत होतो. अचानक कोरोना मुळे लाॅकडाऊन झाल्याने मी अडकून पडलो. बाहेर निघालो तर पोलिस  लाठ्या मारतात. त्यामुळे आम्ही सांगायचं कुणाला हाच खरा प्रश्न आहे. - हेमंत पाटील, विद्यार्थी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख