जनतेत मिसळून कामे करा, मेहनतीचे फळ मिळेल  : खासदार सुप्रिया सुळे

पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार लोकांत मिसळून काम करण्याच्या सूचना देत अंतर्गत मतभेद आणि गटबाजी खपवून घेणार नसल्याची तंबीही या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.
supriya-sule
supriya-sule

नांदेड : स्पर्धेत यश-अपयश या समांतर बाजू आहेत. जनतेत मिळून मिसळून कामे केल्यास मेहनतीचे फळ मिळते. त्याचबरोबर अंतर्गत मतभेद आणि गटबाजी खपवून घेणार नसल्याची तंबीही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी  कार्यकर्त्यांना दिली. 


यशस्विनी अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या पुनर्वसन उपक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे जिल्हा दौऱ्यावर होत्या. मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार उषा दराडे, शंकर अण्णा धोंडगे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, महानगराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

सर्कलनिहाय कार्यकर्त्यांकडून निवडणूकीचा आढावा घेत आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलतही त्यांनी केली. 

 जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत यश-अपयाशावर मते मांडण्यात आली. ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी मतांच्या ध्रुवीकरण, अनास्थेमुळे तळागळातील मतदारापर्यंत पोहचण्यातील अडथळ्यांचे कार्यकर्त्यांनी पाढे वाचले.

धर्माबाद, माहूर, उमरी नगरपंचायतीसह जिल्हा परिषद निवडणुकांमधील यश कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलीत असल्याचे सांगून पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार लोकांत मिसळून काम करण्याच्या सूचना देत अंतर्गत मतभेद आणि गटबाजी खपवून घेणार नसल्याची तंबीही या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती दत्तू रेड्डी, साजीद खान, राजेश कुंटूरकर, शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, किशोर देशमुख, कल्पना डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, कृष्णा मंगनाळे, फेरोजलाला, शिरीष देशमुख गोरठेकर, आत्माराम कपाटे, विश्‍वजित पावडे, शशी पाटील क्षीरसागर, रमेश राठोड, जीवन घोगरे, कांताबाई सोनटक्के, अब्रार सय्यद, शुभम पावडे, रमेश सरोदे, विनायक कुलकर्णी, प्रवीण सारडा, जुबेरभाई, सविता कंठेवाड, श्रद्धा चव्हाण, आशा भिसे उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com