women security now marshal in delhi | Sarkarnama

महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत प्रत्येक गल्लीत मार्शल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या अरविंद केजरीवाल सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गल्लीत (मोहल्ला) मार्शल म्हणजेच सुरक्षारक्षक तैनात करण्याची योजना आखली आहे. 

महिलांवरील अत्याचारांबद्दल दिल्लीची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याबरोबरच महिलांसाठी दिल्ली हे सर्वांत सुरक्षित शहर ठरले पाहिजे, या उद्देशाने ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. 

केजरीवाल यांनी दिल्लीतील परिवहन सेवेच्या बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास घडविण्याच्या योजनेची घोषणा केली त्याच वेळी त्यांनी प्रत्येक बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी मार्शल तैनात करण्यात येतील असे आश्‍वासन दिले होते. महिलांना बसमध्ये त्रास देण्याचे प्रमाण जास्त असल्याच्या अहवालानंतर केजरीवाल यांनी बसमध्ये मार्शलची घोषणा केली होती.

 त्यानंतर बसमध्ये मार्शल दिसू लागले व त्याचा चांगला परिणाम झाल्याचे फीडबॅक केजरीवाल यांना मिळाले. त्यानंतर शहराच्या प्रत्येक मोहल्ल्यात असे मार्शल तानात का करू नयेत, अशी कल्पना पुढे आली. त्याचबरोबर सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, मोहल्ला क्‍लिनीक यासारख्या जुन्या योजनाही तेवढ्याच गतीने चालू ठेवण्याच्याही सूचना त्यांनी अधिकाऱ्याना दिल्या आहेत. 

घरपोच किराणा 
दिल्लीकरांना किराणा सामान दरमहा घरपोच देण्याची योजना केजरीवाल सरकारच्या विचाराधीन आहे. नागरी पुरवठा मंत्री इमरान हुसेन यांच्या मंत्रालयाने तयार केलेली ही योजना केजरीवाल यांनी मान्य केली आहे. हुसेन यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही योजना तत्काळ लागू करण्यासाठी तयारीचा आढावाही घेतला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख