रायगडमधील 'कोरोना'विरूद्धच्या लढाईत चित्रलेखा पाटील अग्रेसर 

आतापर्यंत आमच्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. हे चित्र कायम रहावे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही हे चार तालुके कोरोना मुक्त ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत.
women leader chitralekha patil plays important role against corona in raigad district 
women leader chitralekha patil plays important role against corona in raigad district 

पुणे: "आमच्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नाही. हीच परिस्थिती कायम राहण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्न करत आहोत," असे रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या स्नुषा आहेत. त्यांनी त्यांच्या 'सिएफटीआय' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रायगडमधील अलिबाग, रोहा, मुरुड, पेण या तालुक्यांचे निर्जंतुकीकरण करून घेतले आहे. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलिबाग, रोहा, मुरुड आणि पेण या तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त गावांना 200 निर्जंतुकीकरण पंपाचे वाटप केले आहे. या पंपासोबत त्यांनी 2500 मेट्रिक टन निर्जंतुकीकरण रसायन दिले आहे. स्वतः लक्ष घालून या गावात औषध फवारणी करून गावं  निर्जंतुकीकरण करून घेतली आहेत. गेल्या आठवड्यापासून त्यांनी गावोगावी ही मोहीम राबवली आहे. एका गावात चार चार वेळा फवारणी करता येईल एवढं साहित्य त्यांनी गावोगावी वाटप केले आहे.

या मोहिमेबाबत चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. "अलिबाग, रोहा, मुरुड आणि पेण हे तालुके मुंबई च्या फार जवळ आहेत. या तालुक्यात पर्यटन स्थळं असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. मूळचे या तालुक्यातील असलेले रहिवाशी पण नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये असलेले लोक कोरोनोमुळे त्यांच्या मूळगावी आले आहेत. आतापर्यंत आमच्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. हे चित्र कायम रहावे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही हे चार तालुके कोरोना मुक्त ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत."

"उद्योग बंद झाल्यामुळे ज्या लोकांचं हातावर पोट आहे. त्याचं खूप हाल सुरू होते. आम्ही आमच्या परीने आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढ्या कुटुंबातील लोकांना आम्ही पुढील पंचवीस दिवस पुरेल एवढं रेशनिंग घरपोच केले आहे. काही ठिकाणी आम्ही जेवण घरपोच करत आहोत,"असेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com