शिव्या खायची तयारी ठेवूनच 'त्या' गेल्या आणि 'होम क्वारंटाईन'चे 105 शिक्के मारून आल्या!

कुणी घरात नाही सांगितले, उद्या या म्हटले, तुम्हाला काही काम नाही का, ही झोपायची वेळ झाली, जेवायची वेळ झाली, तर तुम्हालाच कोरोना असेल, तर आमची जबाबदारी कुणी घ्यायची, असे एक ना अनेक प्रश्न विचारून आरोग्यसेविका व आशा सेविका यांना त्या लोकांनी भांडावून सोडले
women health workers finished work of stamping of quarantine patients
women health workers finished work of stamping of quarantine patients

अकोले (नगर) : ''शिव्या द्या, मारा, आम्ही तुमच्या हिताचेच काम करतोय. आम्ही होम कोरोंटाईनचा शिक्का मारणारच'', असा निश्चिय करून त्या आरोग्यसेविका व आशा सेविकांनी सरकारने नेमून दिलेले काम फत्ते केले. 110 पैकी तब्बल 105 जणांना 'होम क्वारंटाईन'चे शिक्के मारूनच त्या घरी परतल्या.

कुणी घरात नाही सांगितले, उद्या या म्हटले, तुम्हाला काही काम नाही का, ही झोपायची वेळ झाली, जेवायची वेळ झाली, तर तुम्हालाच कोरोना असेल, तर आमची जबाबदारी कुणी घ्यायची, असे एक ना अनेक प्रश्न विचारून आरोग्यसेविका व आशा सेविका यांना त्या लोकांनी भांडावून सोडले. शिव्या द्या, मारा, आम्ही तुमच्या हिताचे काम करायला आलो आहोत. आम्हाला सरकारने हे काम करण्यास सांगितले. तुम्ही सहकार्य केले, तर कोरोनापासून तुमचा तर बचाव होईलच, पण इतरांनाही धोका होणार नाही, असे त्या सांगत होत्या. त्यांनी चिकाटीने आपली जबाबदारी पार पाडून दाखवली.

विठा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी एस. जी. चव्हाण, एम. ए. जाधव, आशा देशमुख, ताई आव्हाड, छाया थटार, तरुन्नम तांबोळी यांनी १६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत कोरोनाचे सर्वेक्षण करून परदेशातून, इतर राज्यातून व इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून 'होम क्वारंटाईन' निश्चित केले. त्यांना शिक्के मारण्याचे काम करताना अनेक अडचणी आली.  राजूर येथील चंदननगर, राहुलनगर, सर्वोदय, तांबोळी गल्ली, मोहंडूळवाडी आदी ठिकाणी जाऊन गावात नवीन आलेले व पाहुणे, तसेच नोकरीसाठी इतर देशात व राज्यात असलेले ११५ व्यक्तींना शोधून काढले. त्यापैकी १०५ व्यक्तींना शिक्के मारले. कधी विनंती करत, तर कधी सरपंच ग्रामसेवक व अखेर पोलिसांची मदत घेऊन त्यांचे समुपदेशन करून ३१ मार्चला सायंकाळी पाच वाजेपर्यंत १०५ व्यक्तींना होम कोरंटाईन निश्चित करून त्यांच्या हातावार शिक्का मारून मोकळा श्वास घेतला. याकामी त्यांना सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, भास्कर एलमामे, ग्रामसेवक बाळासाहेब आंबरे यांनी मदत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com