विधानसभा निवडणूक कामकाजात महिलाराज 

 विधानसभा निवडणूक कामकाजात महिलाराज 

पिंपरी : उद्योगनगरीतील तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर तथा आरओ) या महिला असून निवडणूक कामकाजात त्यांनी निवडणुकीच्या कामकाजात नारी शक्तीचा ठसा उमटवला आहे.

एवढेच नाही तर पुणे जिल्ह्यातही पैकी सहा मतदारसंघाच्या आरओ (त्यात वरील तिघी) या महिलाच असून तब्बल एक डझन महिला अधिकारी या एआरओ (सहाय्यक निवडणूक अधिकारी) आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत एकही महिला आमदार झालेली नाही.या टर्मलाही शर्यतीत असलेल्या प्रमुख पक्षांनी पुन्हा महिलांना डावलल्याने या पदापासून महिला पुन्हा वंचितच राहणार आहेत. मात्र, आमदार होणाऱ्या पुरुषांना या पदापर्यंत नेण्याचे काम,मात्र यावेळी महिला करणार आहेत.

कारण तिन्ही मतदारसंघाच्या आरओ या महिला आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरीच्या आरओ या अनुक्रमे वैशाली इंदाणी, मनिषा कुंभार आणि रेश्‍मा माळी आहेत.पहिल्यांदा तिन्ही आरओ महिला मिळाल्या आहेत. 

शहराच्या जोडीने एकूणच जिल्ह्याच्याही निवडणुकीच्या कामकाजात महिलाराजच आहे. उप जिल्हा निवडणुक अधिकारी म्हणून मृणालिनी सावंत, कामकाज पाहत आहेत. तर कायदा व सुव्यस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयामधील उपायुक्त नयना बोंदार्डे, उपायुक्त साधना सावरकर, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी रुपाली आवले, तहसिलदार मनीषा देशपांडे व मीनल भामरे, नायब तहसिलदार अपर्णा तांबोळी या पुणे विभागाचे निवडणुक विषयक काम पाहत आहेत. निवडणुक विषयक प्रशिक्षण अपर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार व उपायुक्त वनश्री लाबशेटवार यांनी उत्तमपणे दिले आहे. 

आदर्श आचारसंहिता राबविण्याचे कामकाज उपजिल्हाधिकारी सुरेखा माने सांभाळत आहेत. मतदार जनजागृती मध्ये महत्त्वपूर्ण असणारे स्वीप व्यवस्थापनच्या (सिस्टीमॅटीक वोटर्स एज्युकेशन ×ण्ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन) उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील आहेत.

विविध बैठकांचे सुयोग्य नियोजन उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के करत आहेत. मतदार मदत कक्षाच्या नियंत्रणाबरोबरच अन्य जबाबदाऱ्या उपजिल्हाधिकारी वर्षा पवार सांभाळत असून मतदान साहित्य पुरविण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्याकडे आहे. 

वित्त व लेखा विभागाच्या उपसंचालक पद्मश्री तळदेकर या खर्च व्यवस्थापन निरीक्षकांच्या समन्वयक म्हणून सक्षमपणे भूमिका पार पाडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वर्षा सहाणे, विद्युत विभागाच्या उपअभियंता अनघा पुराणिक व नलिनी सुत्रावे या मतदान केंद्रस्थळी सोयी-सुविधा पुरवण्याबरोबरच तात्पुरते मतदान केंद्र स्थापन करणे तसेच विद्युत पुरवठा उपलब्ध करुन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. 

दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोयीचं होण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या समन्वयक रोहिणी मोरे विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहेत. निवडणुक प्रक्रियेत संगणकीकरणाचे व्यवस्थापन अश्विनी करमरकर करत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी वाहतूक आराखड्याची जबाबदारी तर विधी अधिकारी स्वाती पंडित या विधी कक्षाव्दारे कायदेविषयक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. 

निवडणुक शाखेच्या तहसीलदार रुपाली रेडेकर व नायब तहसीलदार नेहा चाबुकस्वार विविध प्रकारचे विषय हाताळत आहेत. तसेच एक खिडकी योजनेव्दारे तहसीलदार सुनिता आसवले माहिती देत असून मिडिया सेंटर मध्ये सहायक संचालक वृषाली पाटील व नायब तहसिलदार शैलजा तारु कार्यरत आहेत. लास्ट बट नॉट लिस्ट निवडणुक कामकाजाच्या अखेरच्या टप्यातही मतमोजणी व्यवस्थापनाचे काम अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवाडे यांच्याकडे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com