woman corporator shweta galande gives three months payment for corona patients | Sarkarnama

या नगरसेविकेचे तीन महिन्यांचे मानधन कोरोनाग्रस्तांसाठी

अन्वर मोमीन
गुरुवार, 26 मार्च 2020

पुण्यातील अनेक नगरसेवक आपापल्या परीने कोरोना संकटात मदत करत आहेत. अशा चांगल्या उपक्रमांची दखल घ्यायलाच हवी.

वडगाव शेरी : पुणे शहरातील कोरनाग्रस्त नागरीकांच्या उपचारार्थ माझे तीन महिन्याचे वेतन घ्यावे. तसेच इतर नगरसेवकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे यांनी केले आहे.

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या उत्कृष्ठ उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे नागरीकांना अधिक  चांगल्या आरोग्य सुविधा आणि जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. या संकटाच्या काळात आपत्ती निवारण्यासाठी  मी माझे नगरसेवकाचे वेतन महापौर निधी मध्ये जमा करणार आहे. अशी माहिती नगरसेविका श्र्वेता गलांडे यांनी दिली.

श्वेता गलांडे या पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 विमाननगर सोमनाथनगर येथील नगरसेविका आहेत. कोरोना विरोधात लढण्यासाठी सेवे सोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. माझ्यासोबत पालिकेतील माझे इतर सहकारी नगरसेवकही माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तीन महिन्यांचे वेतन महापौर निधीला देतील अशी आशा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख