`हिवाळी अधिवेशन केवळ हुरडा पार्टीपुरते होऊ देणार नाही' - winter session will not limited to hurada party only, says nana patole | Politics Marathi News - Sarkarnama

`हिवाळी अधिवेशन केवळ हुरडा पार्टीपुरते होऊ देणार नाही'

सरकारनामा ब्युरोे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

येत्या 16 तारखेपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन येथे सुरु होणार आहे. हे अधिवेशन केवळ हुरडा पार्टी आणि पर्यटनासाटी असल्याची टिका नेहमीच केली जाते. पण यावेळचे अधिवेशन हे केवळ "हुरडा पार्टी' होणार नाही, असे महाराष्ट्र विधानसभेचे नुतन अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

नागपूर ः येत्या 16 तारखेपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन येथे सुरु होणार आहे. हे अधिवेशन केवळ हुरडा पार्टी आणि पर्यटनासाटी असल्याची टिका नेहमीच केली जाते. पण यावेळचे अधिवेशन हे केवळ "हुरडा पार्टी' होणार नाही, असे महाराष्ट्र विधानसभेचे नुतन अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच ते नागपुरात आले. दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, परवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल विचार सुरु आहे. यावेळी विधानसभेचा अध्यक्ष विदर्भाचा झालेला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणणे आणि निर्णय घेण्यावर आपला भर राहील. गोंधळ कमी आणि काम जास्त करण्याकडे आपला जास्त कल असेल.

माझ्या निवडीनंतर जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वांना न्याय मिळेल, असे काम करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल. विधानसभेच्या अध्यक्षांना निर्देश देण्याचे अधिकार आहेत. त्या अधिकारांचा योग्य वापर करुन सर्व सदस्यांना संरक्षण देऊन त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे. माझ्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर पहीले अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आता खऱ्या अर्थान जनतेच ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख