गावातल्या हातभट्टीवर आता करडी नजर  - wine | Politics Marathi News - Sarkarnama

गावातल्या हातभट्टीवर आता करडी नजर 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असून ग्रामीण भागात हातभट्टीवाल्यांचा सुळसुळाट असतो. स्थानिक पोलिसांकडून याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असते त्यामुळे आता या अवैध धंद्यावर पाळत ठेवण्यासाठी गावात ग्रामरक्षकची नेमणूक करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. 

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असून ग्रामीण भागात हातभट्टीवाल्यांचा सुळसुळाट असतो. स्थानिक पोलिसांकडून याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असते त्यामुळे आता या अवैध धंद्यावर पाळत ठेवण्यासाठी गावात ग्रामरक्षकची नेमणूक करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. 

राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय असला तरी अन्य जिल्ह्यामध्ये परवान्यांच्या दारू दुकानांमध्ये विक्री केली जाते. त्यातून राज्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र आजही गावात तसेच तालुक्‍याच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीची केंद्रे सुरू असल्याचा संशय आहे , त्याची अवैध रीतीने वाहतूक केली जाते. त्याचप्रमाणे जीवाला हानिकारक असणारी विषारी हातभट्टीची दारू गावाच्या वेशीवर किंवा जंगलात तयार केली जाते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर या हातभट्टी वाल्याकडे लक्ष दिले जाते. हे अड्डे उध्वस्त करता यावेत यासाठी ग्रामरक्षकांनी दिलेल्या गुप्त महितीआधारे धाडीही टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे ग्रामरक्षकाना सरकारचे कवच मिळणार आहे. 

ग्रामस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याबाबत सूचना ग्रह खात्याने दिल्या असून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून शिफारस झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी 30 दिवसाच्या आत स्थानिक पातळीवर ग्रामरक्षक दलाची स्थापना करायची आहे. तसेच तहसीलदार यांच्याकडून ग्रामरक्षक यांना 10 दिवसात ओळखपत्र देण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील अवैध दारू तसेच हातभट्टीवाल्यावर आता जरब बसण्याची शक्‍यता आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख