महिलांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या सुधाकरपंत पारिचारकांना विजयी करा : सुरभी हांडे 

महिलांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या सुधाकरपंत पारिचारकांना विजयी करा : सुरभी हांडे 

मंगळवेढा : मंगलवेढा मतदारसंघातील महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुधाकरपंत परिचारक यांना साथ देत विजयी करण्याचे आवाहन मराठी सिने अभिनेत्री सुरभी हांडे यांनी केले. 

मुरलीधर चौकात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सीमाताई परिचारक, महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख, शीतल बुरकुल,ज्योती चव्हाण,अंजली मोरे,अश्विनी शहा, नगरसेविका निर्मला माने, पंचायत समिती सदस्य राजश्री नागणे,रेणुका साळुंखे,शुभांगी सूर्यवंशी,सविता स्वामी आदीजन उपस्थित होते. 

हांडे म्हणाल्या '' भाजपचे कार्य व त्यांच्या कामाची पद्धत विकासाच्या दृष्टीने चालत आहे. गरिबांना व महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना सुरू करून त्याचा लाभ मिळवून दिला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज वाटप करून महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा केले.

महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना सुरू केली. उज्वला गॅस योजना महिलांसाठी वरदान ठरली आहे. चुलीपुढे स्वयंपाक करण्याचा महिलांचा धुराचा त्रास कमी करण्यासाठी उज्वला योजना राबविली.लहान-मोठ्या उद्योगाना मुद्रा योजनेतून आर्थिक पाठबळ दिले.'' 

यावेळी रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, चरनूकाका पाटील, दामोदर देशमुख,नगरसेवक अजित जगताप,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शिवानंद पाटील,माजी नगरसेवक महादेव जिरगे,चंद्रशेखर कोंडुभैरी,मुजफ्फर काजी,सरपंच रामेश्वर मासाळ,खन्ना माळी आदी मान्यवर उपस्थित होते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com