राष्ट्रवादीतील नाराज झावरे, गुंड भाजपच्या वाटेवर

जिल्ह्यात पक्षांतराचा जोर अजूनही ओसरला नसून राष्ट्रवादीतील नाराज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे व पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड हे भाजपच्या वाटेवर आहेत.
सुजीत झावरे व मंजुषा गुंड
सुजीत झावरे व मंजुषा गुंड

नगर - जिल्ह्यात पक्षांतराचा जोर अजूनही ओसरला नसून राष्ट्रवादीतील नाराज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे व पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड हे भाजपच्या वाटेवर आहेत.

शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नगरमध्ये येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्यावर कार्यकर्त्यांच्या पक्षांतराचे काळे ढग घोंगावत आहेत. 
खासदार डॉ. सुजय विखे पाटील प्रत्येक भाषणात १२ विरुद्ध ० चा नारा देत असून, त्यामुळे विखे पॅटर्नपुढे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपकडे ओढावले जात आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे त्या गटातील नाराज मंजुषा गुंड भाजपच्या वाटेवर आहेत. बाहेरचा उमेदवार देऊन पक्षाने आपल्याला डावलल्याचा त्यांचा आरोप आहे. 

भाजपमध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचीच उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन गुंड त्यांना उमेदवारी मिळणार नसली, तरी राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठीच त्यांचे पक्षांतर होऊ शकते, असे मानले जाते.
 
पारनेर विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. शिवसेनेतून आलेल्या निलेश लंके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज होऊन झावरे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने झावरे यांना भाजपमध्ये जाऊनही उमेदवारी मिळणे शक्य नाही. असे असले, तरी केवळ राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठीच त्यांचे पक्षांतर होऊ शकते, असे मानले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com