यवतमाळकर मदन येरावारांना 'रिपीट' करणार का? 

Yavatmal - Madan Yerawar - Balasaheb Mangulkar
Yavatmal - Madan Yerawar - Balasaheb Mangulkar

नागपूर : यवतमाळ विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात जनतेने 1967 मध्ये विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांना सलग दुसऱ्यांदा निवडून दिले होते. त्यानंतर हे भाग्य कुणालाही लाभले नाही. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भाजपचे उमेदवार मदन येरावारांना ती संधी आहे. त्यामुळे यवतमाळकर 1967 ची पुनरावृत्ती करतील की कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना पसंती देऊन विदर्भवीर धोटेंचा इतिहास कायम ठेवतील, याकडे यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघाचे वर्चस्व संपुर्ण जिल्ह्यावर असते.

यवतमाळ मतदारसंघाच्या निर्मीतीपासून तीन वेळा आमदार होण्याची संधी जांबुवंतराव धोटे आणि मदन येरावार यांनाच मिळाली आहे. पण तेही सलग नाही. 1999 आणि 2009 मध्ये येरावारांना, तर जांबुवंतरावांना 1972 या मतदारसंघाने ब्रेक दिला. यावेळीही भाजपने येरावारांना मैदानात उतरविले आणि त्यांच्यासमोर कॉंग्रेसने 25 वर्ष जिल्हा परीषदेच्या राजकारणात दोन वेळा उपाध्यक्ष आणि सभापती राहीलेले बाळासाहेब मांगुळकर यांना लढवले. विशेष म्हणजे जनतेच्या मागणीवरुन कॉंग्रेसने मांगुळकरांना उमेदवारी दिली.

कारण एक वेळा तरी बाळासाहेबांनी विधानसभा लढवावी, अशी जनतेची इच्छा होती. त्यामुळे जनतेचे उमेदवार म्हणुन त्यांच्याकडे पाहीले जाते. सतत जिल्हा परीषदेच्या राजकारणात ते सक्रीय होते. ग्रामीण विकासाला चालना दिल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरली आहे. निवडणुकीचा निकालाची वेळ काही तासांवर आलेली असताना मतदारांमध्ये उत्सुकता देखील तेवढीच वाढलेली दिसत आहे.

सन 1962 आणि त्यानंतर 1967 मध्ये सलग दोन वेळा जांबुवंतराव धोटे अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 1972 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकचे के.एन. रामचंद्र घारफळकर, 1978 अपक्ष जांबुवंतराव धोटे, 1980 कॉंग्रेस आयचे आबासाहेब पारवेकर, 1985 कॉंग्रेसचे सदाशिवराव ठाकरे, 1990 जनता दलाचे अण्णासाहेब पारवेकर, 1995 भाजपचे राजाभाऊ ठाकरे, 1996 भाजपचे मदन येरावार (पोटनिवडणूक), 1999 कॉंग्रेसचे किर्ती गांधी, 2004 मध्ये भाजपचे मदन येरावार, 2009 कॉंग्रेसचे निलेश पारवेकर, 2013 ला कॉंग्रेसच्या नंदीनी पारवेकर (पोटनिवडणूक) आणि 2014 मध्ये भाजपचे मदन येरावार निवडून आले. असा मतदारसंघाच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com