Will like to work as Home Minister - Pankaja Munde | Sarkarnama

गृहखाते मिळाले तर आवडेल - पंकजा मुंडे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 एप्रिल 2017

बीड : "बाबांनी युतीचे सरकार असताना गृहखाते सांभाळले होते, तेव्हापासूनच मला गृहखाते आवडायचे. त्यामुळे या खात्याची मंत्री व्हायला मला निश्‍चितच आवडेल अशी इच्छा राज्याच्या ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आता मुख्यमंत्रीपद नाही तर, मुख्यमंत्र्यांकडे असलेले गृहमंत्रिपद तरी आपल्याला मिळावे अशी आशा बाळगून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.

माजलगाव येथील पोलिस उपविभागीय कार्यालयासह विविध कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री होण्याची आपली
इच्छा बोलून दाखवली. पूर्वीच्या युती सरकारच्या काळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गृहखात्याचा कारभार होता, तेव्हा त्यांनी मुंबईतील गुन्हेगाराचे कंबरडे मोडले होते. हा संदर्भ देत या खात्याचे काम आपण जवळून पाहिले आहे. त्यामुळे गृहखात्याची मंत्री झाल्यास मला आनंदच होईल अशा शब्दांत पंकजा यांनी गृहखात्या बद्दलची ओढ आणि आवड बोलून दाखवली. पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केल्याने आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय असेल? यावर जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती देण्यात आल्याचा सुर सुरवातीपासूनच शिवसेनेतून काढला जात होता. मुख्यमंत्र्यांकडील गृहखाते शिवसेनेला मिळावे अशी मागणी देखील यापूर्वी वारंवार करण्यात आली होती. आता पंकजा मुंडे यांनीच गृहखाते मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केल्याने शिवसेनेची गोची झाल्याचे बोलले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख