मूलभूत सुविधा, सिंचन, रोजगाराची सांगड घालण्यासाठी कटिबद्ध : ज्ञानज्योती भदाणे

विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपतर्फे पहिल्या महिला उमेदवाराचा मान मिळविणाऱ्या नगावच्या सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी सभा, रॅलीव्दारे सर्व गावे पिंजून काढली. त्यांनी संधी मिळाल्यास केंद्र व युती सरकारच्या माध्यमातून मूलभूत सुविधा, सिंचन, रोजगाराची सांगड घालून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवू, अशी ग्वाही दिली.
Dhule Rural BJP Candidate Dnyanjyoti Bhadane
Dhule Rural BJP Candidate Dnyanjyoti Bhadane

धुळे : विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपतर्फे पहिल्या महिला उमेदवाराचा मान मिळविणाऱ्या नगावच्या सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी सभा, रॅलीव्दारे सर्व गावे पिंजून काढली. त्यांनी संधी मिळाल्यास केंद्र व युती सरकारच्या माध्यमातून मूलभूत सुविधा, सिंचन, रोजगाराची सांगड घालून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवू, अशी ग्वाही दिली.

भाजप- शिवसेना- आरपीआय महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारात खासदार डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. भामरे यांना धुळे ग्रामीणने एक लाखाचे मताधिक्‍य मिळाल्याने उमेदवार भदाणे यांना सव्वालाखाचे मताधिक्‍य मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा या मतदारसंघातील सभेतून व्यक्त केली. याची जबाबदारी डॉ. भामरे व मंत्री रावल यांच्यावर निश्‍चित केली. त्यामुळे या नेत्यांसह महायुतीचे पदाधिकारी कंबर कसून प्रचाराचा मैदानात उतरले. सभा, रॅलीव्दारे त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला.

केंद्रात मोदी सरकार व राज्यात महायुतीचे सरकार आल्यास धुळे ग्रामीणच्या विकासाला चालना मिळेल. भाजपचे खासदार निवडून आल्यानंतर याच पक्षाचे आमदार राहिल्यास धुळे ग्रामीणच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही, असा मुद्दा पुढे रेटत उमेदवार भदाणे यांच्यासाठी प्रचार झाला. मतदारसंघात सिंचन, मूलभूत व पायाभूत सुविधा, रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावून निरोगी जीवनमानासाठी आरोग्य सुविधांचे बळटीकरणाचा मुद्दा उमेदवार भदाणे यांनी मांडला. त्यांच्यासह पती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, सुपुत्र भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे आणि कुटुंबीय सदस्य प्रचारात उतरले होते. धुळे ग्रामीणमध्ये प्रथमच महिला उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com