तयारी विधानसभेची : बागलाणमध्ये आमदार दीपिका चव्हाणांविरोधात पुन्हा उमाजी बोरसे? 

धुळे लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि कॉंग्रसचे कुणाल पाटील यांनी चुरशीने लढली. मात्र, बागलाणमध्ये इच्छुकांसाठी ती विधानसभेची रंगीत तालीम असावी, एव्हढ्या तडफेने त्यांनी प्रचारात झोकून दिले होते. त्यामुळे कॉंग्रेसला आघाडी मिळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार दीपिका यांनी भरपूर कष्ट घेतले. भाजपसाठी माजी आमदार उमाजी बोरसे यांनी भाजपसाठी सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे कोणाला आघाडी मिळते यावर आमदार चव्हाण विरुध्द भाजपचे बोरसे असे चित्र तयार झाले आहे.
तयारी विधानसभेची : बागलाणमध्ये आमदार दीपिका चव्हाणांविरोधात पुन्हा उमाजी बोरसे? 

सटाणा : धुळे लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि कॉंग्रसचे कुणाल पाटील यांनी चुरशीने लढली.  मात्र, बागलाणमध्ये इच्छुकांसाठी ती विधानसभेची रंगीत तालीम असावी, एव्हढ्या तडफेने त्यांनी प्रचारात झोकून दिले होते. त्यामुळे कॉंग्रेसला आघाडी मिळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार दीपिका यांनी भरपूर कष्ट घेतले. भाजपसाठी माजी आमदार उमाजी बोरसे यांनी भाजपसाठी सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे कोणाला आघाडी मिळते यावर आमदार चव्हाण विरुध्द भाजपचे बोरसे असे चित्र तयार झाले आहे. 

धुळे लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील बागलाण मतदारसंघाला विशेष राजकीय महत्व निर्माण झाले आहे. भाजप व कॉंग्रेस दोन्ही पक्षाचे उमेदवार धुळे मतदारसंघातील आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या राजकीय करिअरसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी त्यांनी वर्षभर आधीच भविष्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेऊन सावध पावले टाकली होती. त्यासाठी त्यांनी सटाणा शहरासाठी पुनद धरणातुन 52 कोटींची पाणी योजना, तळवाडे-भामेर पोच कालवा, हरणबारी डावा व उजवा कालवा, केळझर चारी क्रमांक 8, उत्तर पुनद प्रकल्पाला तत्वतः मंजुरी ही कामे केल्याचा दावा व प्रचार केला. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांना मतदारसंघात निमंत्रीत केले होते. मतदारसंघातील स्थानिक नेत्यांतील राजकीय वाद आणि संघर्षाचा त्यांनी वापर करुन घेतला. त्यामुळे माजी आमदार उमाजी बोरसे यांनी प्रचारात भाजपचे विधानसभेचे उमेदवार म्हणुन स्वतःला प्रोजेक्‍ट केले. शिवसेनेच्या साधना गवळी, भाजपचे उमाजी बोरसे त्यांच्या बरोबर होते. 

सटाणा नगरपालिका व शहरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या पत्नी दीपिका चव्हाण मतदारसंघाच्या आमदार आहेत. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना बरोबर घेऊन स्वतः संजय चव्हाण प्रचाराची सर्व सूत्रे हाती घेतली होती. डॉ. भामरे ज्या योजनांचा गाजावाजा करतात त्या सर्व आमदार म्हणुन आपल्या पाठपुराव्याने मंजुर झाल्या आहेत. त्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा व प्रशासनाकडे प्रयत्न केल्याचे त्यांनी प्रचारात सांगितले. त्यासाठी त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. ते स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

लोकसभा निवडणुकीत 2014 मध्ये मोदी लाटेमुळे डॉ. भामरे यांना येथुन अठ्ठावीस हजार मतांची आघाडी होती. यंदा वातावरण तसे नव्हते. मोदींच्या विरोधात प्रचारो मुद्दे आणि कॉंग्रसेचे उमेदवार कुणाल पाटील यांचे नियोजन यामुळे त्यांनी प्रचारात भाजपसाठी आव्हान उभे केले होते. भाजप व कॉंग्रेस दोन्ही पक्षांचे उमेदवार धुळ्याचे आहेत. त्यामुळे तेथे चुरश आहे. अशा स्थितीत बागलाणमध्ये कोणाला व किती आघाडी मिळते याचा निकालावर परिणाम होईल. विधानसभा निवडणुकीचा प्रचारही त्यावरच होईल. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दीपिका चव्हाण व भाजपचे उमाजी बोरसे यांना लोकसभेचे मतदान जास्त प्रतिष्ठेचे बनले आहे. मतदारांनी कोणाला कौल दिला हे मात्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. 

डॉ. भामरे यांनी बागलाणसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. आमदार म्हणुन ज्या कामांना आम्ही पाठपुरावा करुन मंजुरी मिळवले ती आम्ही केला असा त्यांनी डांगोरा पिटला. त्यामुळे मतदार व शेतकरी कॉंग्रेस आघाडीलाच पाठींबा देतील - संजय चव्हाण, माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

आजवर बागलाणसाठी प्रलंबीत व पाण्याच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणीही काम केले नाही. डॉ. भामरे यांनी राज्य सरकारमध्ये आपले वजन वापरुन बागलाणसाठी मोठ्या कामांना मंजुरी मिळवली. त्यामुळे मतदारसंघात मोदी लाट आहे. भाजपलाच आघाडी मिळेल - उमाजी बोरस्ते, माजी आमदार, भाजप. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com