उद्धव ठाकरे शपथविधी सभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करणार ? 

पुणे शहर व जिल्ह्यातून पाचशे गाड्या उद्या मुंबईला निघणार असल्याने या संपूर्ण ताफ्याची माहिती जिल्हा व पुणे शहर पोलिसांनाही देण्यात आल्याचेही कटके यांनी सांगितले.
uddhav_thakre.
uddhav_thakre.

शिक्रापूर : राजस्थान आणि मध्यप्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेताच  शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती . या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच उद्धव ठाकरे  शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी बाबत महत्वाची घोषणा करतील असा तर्क लढविला जात आहे. 

गुरुवारी होणाऱ्या मेळाव्यास पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी घेवून जाणार असल्याचे  जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी सांगितले . विशेष म्हणजे शेतकऱ्यांबाबत उध्दव ठाकरे  काही 'ठोस' बोलणार असल्याचेही 'मातोश्री' वरून सांगण्यात आल्याने आम्ही कमाल संख्येने शेतकरी बांधव सोबत नेणार असल्याचे कटके यांनी सांगितले.

तब्बल २४ वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्याने पुण्यातून सुमारे दोन हजार शिवसैनिकांचा ताफा उद्या शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला मुंबईत पोहचणार आहे. तसा निरोप ’मातोश्री’वर देण्यात आला असून मातोश्रीकडून रितसर निमंत्रण आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली. दरम्यान पुणे शहर व जिल्ह्यातून पाचशे गाड्या उद्या मुंबईला निघणार असल्याने या संपूर्ण ताफ्याची माहिती जिल्हा व पुणे शहर पोलिसांनाही देण्यात आल्याचेही कटके यांनी सांगितले.


       सन १९९५ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होवूवून तब्बल २४ वर्षे उलटली. पुढे शिवसेनेने अनेक राजकीय बरे-वाईट अनुभव घेतले शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा   ही सामान्य शिवसैनिकांची भूमिका अखेर शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्विकारली.  कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने २४ वर्षांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपलीशी केली. याच आनंदोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी पुणे शहर, जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह  असून उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी तब्बल २हजार  शिवसैनिकांची उद्या मुंबईला निघण्याची तयारी झाल्याची माहिती जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली.

दरम्यान या सर्व शिवसैनिकांना नेण्यासाठी सुमारे ५०० गाड्यांची तजवीज करण्यात आली असून या सर्व गाड्या एकाच वेळी मुंबईकडे रवाना होणार आहेत.  वाहतूकीचा ताण पोलिसांवर आणि दैनंदिन मुंबई-पुणे महामार्गावर येवू नये म्हणून ही सर्व बाब पुणे जिल्हा पोलिस तसेच पुणे शहर पोलिस यांना कळविण्यात आल्याची माहितीही श्री कटके यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. दरम्यान या सर्व पुणेकर शिवसैनिकांचा समन्वय खासदार विनायक राऊत करीत असल्याचेही सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com