मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यवतमाळमधून निवडणूक लढणार ?

मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची काल शपथ घेतली. त्यांना आता सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परीषदेवर निवडून यावे लागेल. ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यवतमाळमधून निवडणूक लढणार ?

नागपूर - मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची काल शपथ घेतली. त्यांना आता सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परीषदेवर निवडून यावे लागेल. ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघातून लढावे, अशी जिल्ह्यातील शिवसैनिकांची मागणी आहे. कारण येथील आमदार तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यवतमाळातून लढल्यास महाराष्ट्राला पुन्हा विदर्भाचा मुख्यमंत्री मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहेत. भाजपसोबत सत्तेत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला होता. तेव्हापासून ते शेतकऱ्यांना हवेहवेसे वाटायला लागले. आदीवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथून लढल्यास या आत्महत्या थांबतील आणि जिल्हा विकासाच्या यात्रेत सहभागी होईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना वाटतो. यापूर्वी या मतदारसंघातून तानाजी सावंत आमदार होते. त्यांनी जिल्ह्याकडे अजिबात लक्ष न दिल्याचा आरोप आहे. गेल्या काही काळापासून यवतमाळात गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परिणामी नागरीक भयभित होऊन जगत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच येथील आमदार झाल्यास गुंडगिरीला चाप बसणार आहे. त्यामुळे त्यांनी येथूनच लढावे, अशी जिल्ह्यातील शिवसैनिकांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होणार, अशी सुत्रांची माहिती आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघात 439 मतदार आहेत. गेल्या वेळी येथून तानाजी सावंत यांना 378 मत मिळाली होती आणि शिवसेनेचा भगवा फडकला होता. हा मतदारसंघ सुरक्षित असल्याने येथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढतील, अशी चर्चा सैनिकांमध्ये आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथून निवडणूक लढावी, यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार आणि जिल्हाप्रमुख पराग पिंगळे आग्रही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com