जे कराडात घडले तसे उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात करून दाखवतील का ?

................
 जे कराडात घडले तसे उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात करून दाखवतील का ?

कऱ्हाड : सातारा पालिकेच्यावतीने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहिम सध्या थंडावली आहे. पण कराड शहरात या मोहिमेने जोर धरला आहे. जे काम खासदार श्रीनिवास पाटील व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराडात करून दाखवले ते काम साताऱ्यात उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करून दाखविणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

सातारा पालिकेने अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे. पण त्यामध्ये सातत्य नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. चार दिवसांपूर्वी काढलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहू लागली आहेत. त्यापाठोपाठ कराड पालिकेनेही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला पाठबळ दिले. मोठा पोलिस बंदोबस्त दिला. या धाडसी मोहिमेतून आतापर्यंत 350 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे या मोहिमेची धास्ती घेऊन अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली आहे. 

साताऱ्यात नेमकी उलट परिस्थिती आहे, येथे पोलीस बंदोबस्तच दिलेला नाही. अतिक्रमणे काढली की चार दिवसात पुन्हा उभी राहत आहेत. सातारा पालिकेत माजी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सत्ता आहे. या दोघांनी कराडच्या नेत्यांप्रमाणे भूमिका घेतल्यास सातारा शहर ही अतिक्रमण मुक्त होऊ शकते. त्यामुळे श्रीनिवास पाटील व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही भूमिका कराडात घेतली त्याप्रमाणे साताऱ्याचे दोन्ही राजे घेणार का, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक उपस्थित करू लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com