सुधाकर परिचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

विधानपरिषदेचे आ. प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर साखर कारखान्यावर आपल्या समर्थकांचा मेळावा घेत मोठे शक्तिप्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनांमधून 'आमचं ठरलयं' हे संकेत राहुल शहाला आपल्या गटात घेत दिले असले तरी विधानसभेच्या कोण आखाड्यात उतरणार याचे नाव जाहीर केले नव्हते. पण विधानसभेच्या आखाड्यात ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून 'जिथून माघार तिथून सुरुवात' या नावाने होत आहे.
Sudhakar Paricharak
Sudhakar Paricharak

मंगळवेढा :  विधानपरिषदेचे आ. प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर  साखर कारखान्यावर आपल्या समर्थकांचा मेळावा घेत मोठे शक्तिप्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनांमधून 'आमचं ठरलयं' हे संकेत राहुल शहाला आपल्या गटात घेत दिले असले तरी विधानसभेच्या कोण आखाड्यात उतरणार याचे नाव जाहीर केले नव्हते. पण विधानसभेच्या आखाड्यात ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून 'जिथून माघार तिथून सुरुवात' या नावाने होत आहे. त्यामुळे ते विधानसभेचे उमेदवार होतात काय, याकडे परिचारक समर्थकांचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून  जिल्हा परिषद निवडणुकीत आ. प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे राजेंद्र राऊत समाधान आवताडे, विजयराज डोंगरे यांनी राजकारणाची नवीन समीकरणे मांडली. त्यातून नवे राजकारण सुरु होत आ.प्रशांत परिचारक यांनी विधान परिषद पटकावली. त्यांच्या आमदारकीचा अजून बराच कालावधी शिल्लक असल्यामुळे ते विधानसभेच्या आखाड्यात नसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक हे यांनी 25 वर्षाच्या आमदारकीच्या कामांमुळे त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग तयार झाला आहे. त्यांच्या शब्दाला आजही कार्यकते सन्मान देतात.

परंतु, या वर्गाला सन 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते-पाटील यांना पंढरपूरच्या आखाड्यात उतरल्यामुळे शांत राहावे लागले. त्यामुळे 'या दहा वर्षातील शांततेमुळे बस झालं आता शांत राहायचं नाही जिथून माघार तिथून सुरुवात' या सदरातून सुधाकर परिचारक यांच्या नावाची सध्या विधानसभेच्या आखाड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून  येऊ लागली.  त्यामुळे येत्या दहा पंधरा दिवसांत परिचारक गटातून नेमके कोण आखाड्यात येणार की मुख्यमंत्र्यांचे शब्द मानून शांत राहणार, हे देखील स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com