पगारवाढीच्या मुद्द्यावर कामगार संघटना आक्रमक , पुन्हा एसटीचा संप ?

पिंपरीःअपेक्षित पगारवाढीचा प्रस्ताव न आल्याने राज्यात पुन्हा एसटीचा संप होण्याची दाट शक्‍यता आहे.त्याचा निर्णय उद्या (ता.ता.19) मुंबई येथे एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
shivneri-bus
shivneri-bus

पिंपरीःअपेक्षित पगारवाढीचा प्रस्ताव न आल्याने राज्यात पुन्हा एसटीचा संप होण्याची दाट शक्‍यता आहे.त्याचा निर्णय उद्या (ता.ता.19) मुंबई येथे एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

गेल्यावर्षी ऐन दिवाळीत चार दिवस झालेल्या एसटी संपामुळे राज्यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्याला काही महिने व्हायच्या आत दहावी, बारावी परीक्षांच्या तोंडावर पुन्हा एसटी संपाची टांगती तलवार लटकल्याने प्रवासी व त्यातही एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत.

एसटी प्रशासनाने एक हजार 76 कोटी रुपयांची पगारवाढ कर्मचाऱ्यांना देऊ केली होती.मात्र,ती पुरेशी नसल्याने त्यांनी दिवाळीत बेमुदत संप केला.त्यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यात मध्यस्थी केली. त्यामुळे हा संप चार दिवसांत मागे घेण्यात आला. कामगारांच्या पगारवाढीच्या मुख्य मागणीसाठी न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमली.

 या समितीने प्रशासनाने देऊ केलेल्या पगारवाढीत वाढ करण्याऐवजी ती कमी केली. 1,076 कोटी रुपयांऐवजी त्यांनी 741 कोटींचीच वाढ देण्याचा प्रस्ताव दिला. तसेच हा प्रस्ताव देताना कामगार संघटनेला विचारात घेण्यात आले नाही. त्यामुळे तो संघटनेने परवा मुंबई येथे झालेल्या बैठकीत  एकतर्फी ठरवीत अमान्य केला.

प्रशासनाने देऊ केलेल्या वेतनवाढीपेक्षा कमी वाढ सुचविणारा उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव म्हणजे कामगारांची क्रूर चेष्टा आहे, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, "प्रशासनाने देऊ केलेल्या वेतनवाढीपेक्षाही कमी वाढीचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीने दिला आहे. त्याव्दारे कामगारांच्या मूळ वेतनात फक्त साडेपाच टक्के वाढ होणार आहे. परिणामी त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे संपासह कोणतीही कृती करण्याच्या विचारात ते आहेत. याबाबतचा निर्णय शुक्रवारच्या कृती समितीच्या बैठकीत होईल''.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com