अजित पवारांच्या निर्णयामुळे सोलापूर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या गटाने निषेधाची भूमिका घेतली आहे. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी मात्र अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अजित पवारांच्या निर्णयामुळे सोलापूर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर!

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या गटाने निषेधाची भूमिका घेतली आहे. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी मात्र अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

सोलापूर शहरासह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्या आणि जुन्यांचा छुपा वाद आहे. शरद पवार समर्थक विरुद्ध अजित पवार समर्थक हा वाद राष्ट्रवादी एकसंध असतानाही अधून-मधून दिसत होता. या वादाने आज उघड स्वरूप दाखविले आहे. माजी नगरसेवक दीपक राजगे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, सेवा दलचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, शंतनू साळुंखे यांनी अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन करून मुर्दाबाद व निषेधाच्या घोषणा दिल्या. 

शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन करताना ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्याची धमक अजित पवार यांच्यात आहे. कोणाला काहीही वाटेल परंतु अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा योग्य असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. 

जिल्ह्याच्या गटाकडे लक्ष 

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही मोहोळ, माढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर या तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार समर्थक व शरद पवार समर्थक असे दोन गट कार्यरत आहेत. अजित पवार ब्रिगेड नावाने ओळखले जाणारे नेते येत्या काळात कोणत्या पवारांसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com