युतीच्या जागावाटप सूत्रात नाशिकमध्ये भाजपला फायदा तर शिवसेनेला फटका? 

राज्याच्या पहिल्या व अखेरच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी नाशिकचे चारही भाजप आमदार अनुत्सूक असल्याचे चित्र होते. शंभर दिवसांचे मंत्रीमंडळ व आचारसंहितेमुळे यानंतर आठ ते दहा मंत्रीमंडळ बैठका होतील. युतीतील जागावाटपात भाजपकडे जिल्ह्यातील सहा जागांपैकी चार ठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी आणि कळवण, नांदगाव या दोन जागा पदरात पाडून निवडणूकीला सामोरे जाण्याच्या तयारीला नेत्यांनी प्राधान्य दिल्याचे आमदारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
युतीच्या जागावाटप सूत्रात नाशिकमध्ये भाजपला फायदा तर शिवसेनेला फटका? 

नाशिक : राज्याच्या पहिल्या व अखेरच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी नाशिकचे चारही भाजप आमदार अनुत्सूक असल्याचे चित्र होते. शंभर दिवसांचे मंत्रीमंडळ व आचारसंहितेमुळे यानंतर आठ ते दहा मंत्रीमंडळ बैठका होतील. युतीतील जागावाटपात भाजपकडे जिल्ह्यातील सहा जागांपैकी चार ठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी आणि कळवण, नांदगाव या दोन जागा पदरात पाडून निवडणूकीला सामोरे जाण्याच्या तयारीला नेत्यांनी प्राधान्य दिल्याचे आमदारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात नाशिकला पुन्हा एकदा ठेंगा मिळाला. आमदार प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. त्यांमूळे एकप्रकारे सरकारकडून अन्यायाची परंपरा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कायम ठेवल्याची भावना व्यक्त होत आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर वेगाने विस्तारणारे शहर, उत्तर महाराष्ट्राची राजधानी, महत्त्वाचे राजकीय केंद्र या सर्वांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळात नाशिकला अपेक्षित असे मंत्रिपद मिळाले नाही. शिवसेनेच्या कोट्यातून दादा भुसे यांना ग्रामविकास राज्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे भाजपला संधी मिळाली असती तर राज्यमंत्रीपद मिळाले असते. त्यापेक्षा विधानसभेचा अनुभव गाठीशी असल्याने पुढच्या सरकारमध्ये नाशिकच्या आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची आस आहे. 

आगामी निवडणूकीत युतीमध्ये निम्म्या जागांचा फॉर्म्युला आहे. नाशिकमध्ये पंधरापैकी नाशिक पूर्व, पश्‍चिम, मालेगाव मध्य, सटाणा, कळवण, सुरगाणा या सहा जागा भाजपकडे असतात. सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, इगतपूरी, देवळाली, नाशिक मध्य, मालेगाव बाह्य, दिंडोरी या नऊ जागा शविसेनेकडे असतात. अशा स्थितीत यंदा भाजपला अधिक जागा मिळून शिवसेनेच्या कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने नव्या जागावाटपाच्या सुत्रांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याचीच शक्‍यता आहे. त्यांच्या नांदगाव, कळवण-सुरगाणा या दोन जागांवर भाजप दावा ठोकण्याची शक्‍यता आहे. 

पक्षनेतृत्वाने विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोणातून मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्याचा समन्वय महत्वाचा आहे. गिरीश मंहाजन जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने नाशिकला मंत्रीमंडळात खंबीर नेतृत्व आहे. आम्ही विधानसभा निवडणूकीला प्राधान्य देतो.- महेश हिरे, भाजप नेते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com