खानदेशातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील, कॉंग्रेसचे के.सी.पाडवीना मंत्रीपद निश्‍चित!

Will Gulabrao Patil and KC Padvi get Ministry
Will Gulabrao Patil and KC Padvi get Ministry

जळगाव : राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचा उद्या (ता.28) शपथविधी होत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात खानदेशातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील व के.सी.पाडवी यांना मंत्रीपद मिळणार हे निश्‍चित आहे. या शिवाय राज्यमंत्रीपदावर कॉंग्रेसचे धुळ्याचे कृणाल पाटील व जळगावच्या रावेर मतदार संघातील शिरीष चौधरी यांच्यापैकी कुणाचा नंबर लागणार याबाबत उत्सुकता आहे.

राज्यात कॉंग्रेसचे आणि त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकारन असतांना खानदेशला मंत्रीमंडळात चांगले स्थान मिळाले आहे. यावेळी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला महाविकास आघाडीत चांगले स्थान मिळण्याचे संकेत आहेत. खानदेशातील 20 जागा पैकी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला नऊ जागा मिळाल्या आहेत.कॉंग्रेसला चार, शिवसेनेला चार तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली असून दोन अपक्ष निवडून आले आहेत. 

त्यांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे. भाजपला आठ जागा मिळाल्या आहेत. तर धुळे शहर मतदार संघातून एमआयएमचा उमेदवार विजयी झाला आहे. युती सरकारच्या मंत्रीमंडळात खानदेशला तीन मंत्रीपदे यात भाजपचे गिरीश महाजन व जयकुमार रावल हे कॅबीनेट मंत्री होते. तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री होते. भाजपचे एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदार संघातील आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रीपद निश्‍चित मानले जात आहे. युती सरकारच्या मंत्रींमडळात पाटील हे सहकाराज्यमंत्री होते. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंमडळात त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळण्याची शक्‍यता आहे. 

मात्र त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. याशिवाय पक्षातर्फे एक राज्यमंत्रीपद दिले गेल्यास पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना सधी मिळून शकते. तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी येथे सातव्यांदा निवडून आलेले कॉंग्रेसचे आमदार के.सी. पाडवी यांचे मंत्रीपद निश्‍चित मानले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेत त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळण्याची शक्‍यता आहे. तर धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीणचे कॉंग्रेसचे आमदार कृणाल पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये फाटाफुट होत असतांना ते कॉंग्रेससोबत ठाम राहिले त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्‍यता आहे. 

तर जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसच्या कोट्यातून रावेर येथील आमदार शिरीष चौधरी यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसला जिल्ह्यात एकही मंत्रीपद नव्हते. गेल्या अनेक वर्षात जळगाव जिल्हयात कॉंग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस अधिकच कमकुवत झाली.कॉंग्रेस बळकट करण्यासाठी यावेळी कॉंग्रेसचे रावेर येथील एकमेव आमदार चौधरी यांना राज्यमंत्रीपद हमखास मिळण्याची शक्‍यता आहे.

जळगाव जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट होती.एकेकाळी या पक्षाचे सहा आमदार होते. मात्र यावेळी केवळ अमळनेर येथून अनिल भाईदास पाटील हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षातून अनेक नेते फुटून गेले. परंतु जिल्ह्यात एकही नेता फुटला नाही. जिल्ह्याने पक्षाला चांगली साथ दिल्याचे पक्षाचे नेते शरद पवारही यांनीही जाहिरपणे सांगितले होते. मात्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पक्षाला आता ताकद देणे गरजेचे आहे.

अशा स्थितीत एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र काही कारणामुळे त्यांना मंत्रीपद नाही दिल्यास पक्षाचा आक्रमक चेहरा असलेले व शरद पवार यांच्या विश्‍वासातील पारोळा एंरडोल मतदार संघातील माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, ही दुसऱ्या टप्प्यातही असू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com