ताई-भाऊंच्या संघर्षात सेना विभागणार का?

यवतमाळ जिल्यात शिवसेनेचे एक आमदार आणि एक खासदार आहेत. येथे सेनेत खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड असे सरळसरळ दोन गट पडले आहेत. भावनाताई आणि संजूभाऊ यांच्यातील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकाच्या तोंडावर ताई आणि भाऊंच्या संघर्षात सेना विभागणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
ताई-भाऊंच्या संघर्षात सेना विभागणार का?

नागपूर : यवतमाळ जिल्यात शिवसेनेचे एक आमदार आणि एक खासदार आहेत. येथे सेनेत खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड असे सरळसरळ दोन गट पडले आहेत. भावनाताई आणि संजूभाऊ यांच्यातील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकाच्या तोंडावर ताई आणि भाऊंच्या संघर्षात सेना विभागणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास लोकसभा लढविणार, असे वक्तव्य संजय राठोड यांनी नुकतेच केले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात मला तयारी करण्याची आवश्‍यकता नाही. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मला निवडणूक लढायला काही अडचण नसल्याचेही ते बोलले. विद्यमान खासदार सेनेच्याच असताना संजय राठोड यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवाय जिल्ह्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने आता पुढे काय राजकीय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 विद्यमान खासदार भावना गवळी यांना ही निवडणूक सेनेकडून लढविताना संजय राठोड गटाकडून अप्रत्यक्ष विरोध राहणार असल्याचे चित्र आहे. पण आज अमरावती येथे झालेल्या युतीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी भावना गवळी यांची उमेदवारी घोषीत करुन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी संजय राठोड यांना दिली. त्यामुळे या परीस्थितीत बदल होईल का, हे येणारा काळच सांगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com