शीला शिवशरण यांना सोलापूर जि.प. अध्यक्ष करण्यासाठी समाधान आवताडेंचा कस लागणार

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावेदार असले तरी समविचारी नेत्यांनी संधी दिली तर मला या पदावर काम करण्याची इच्छा आहे. - शीला शिवशरण, माजी सभापती, समाज कल्याण समिती, सोलापूर जिल्हा परिषद
शीला शिवशरण यांना सोलापूर जि.प. अध्यक्ष करण्यासाठी समाधान आवताडेंचा कस लागणार

मंगळवेढा :- सोलापूर जि.प. अध्यक्षाचे पद राखीव झाल्यामुळे या पदासाठी इच्छुक अनेक असले तरी राज्याच्या नव्या समीकरणामुळे अध्यक्षपदाची खिचडी कुणाच्या ताटात पडणार याची उत्सुकता असली तरी भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करता समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांच्यासाठी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
        
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जि.प. निवडणुकीमध्ये आवताडे गटातून त्या हुलजंती जि. प. गटातून माजी पालकमंत्र्याच्या पत्नीचा पराभव करत त्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अलगद बाजूला ठेवण्यासाठी जिल्ह्यातील समविचारी गटाच्या नेत्यानी एकत्र येऊन जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित केले. या समविचारी नेत्यांमध्ये आ. संजयमामा शिंदे यांच्या सोबतीला मंगळवेढ्यातील दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी शीलाताई शिवशरण यांना समाजकल्याण खात्याच्या सभापती करण्यामध्ये योगदान दिले. 
अडीच वर्षांच्या काळात जि.प.च्या राजकारणात नवख्या असल्या तरी त्या पदावर सक्षमपणे काम करत या खात्याच्या विविध योजना जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राबवत त्या प्रमाणात निधी प्राप्त केला. अशा परिस्थितीत जिल्ह्यांमध्ये स्वतःची ओळख चांगल्या पद्धतीने निर्माण केली. अध्यक्ष पदासाठी झालेल्या सोडतीत राखीव झाल्यामुळे त्या जि.प. मोठा कारभार असल्यामुळे या पदावर काम करणारी व्यक्ती हे अनुभवी आणि सर्वसमावेशक असली पाहिजे. 

या समविचारी नेत्यांतून आ. संजय शिंदे आ. प्रशांत परिचारक आ. राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील,विजयराज डोंगरे यांच्यासह इतर नेत्यांना अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. परंतु या समविचारी नेत्यांमध्ये समाधान आवताडे  हे सध्या मागे राहिले असल्यामुळे जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवताडे गटाच्या शिला शिवशरण यांना अध्यक्षपदाची संधी देऊन हे समविचारी नेते पुन्हा आपली मोठ बांधतात का याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे

आ. संजय शिंदे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी दिलेल्या संधीत समाज कल्याण विभागात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लावता विश्वास आणि विकासाचे राजकारण करत समाज कल्याण च्या विविध योजना जिल्ह्यामध्ये चांगल्या चांगल्या पध्दतीने राबवून जि. प. नावलौकिक वाढवला. या कामाच्या अनुभवामुळे अध्यक्षपदासाठी दावेदार असले तरी समविचारी नेत्यांनी संधी दिली तर मला या पदावर काम करण्याची इच्छा आहे.
- शीला शिवशरण, माजी सभापती, समाज कल्याण समिती, सोलापूर जिल्हा परिषद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com