शताब्दी स्मारक कार्यक्रमात मुख्यमंत्री, खासदारांकडुन कौतुक : शंभुराज देसाई पडणार का कमळाच्या प्रेमात?

पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांचा अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेला संपर्क आणि जवळीक यातून आगामी निवडणुकीसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पाटणला मुख्यमंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. पाटण मतदारसंघात त्यांचे वाढलेले दौरे पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीखातर आमदार देसाई हे कमळाच्या प्रेमात पडणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
शताब्दी स्मारक कार्यक्रमात  मुख्यमंत्री, खासदारांकडुन कौतुक : शंभुराज देसाई पडणार का कमळाच्या प्रेमात?

कराड : पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांचा अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेला संपर्क आणि जवळीक यातून आगामी निवडणुकीसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पाटणला मुख्यमंत्र्यांचे दौरे वाढले आहेत.  पाटण मतदारसंघात त्यांचे वाढलेले दौरे पाहता  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीखातर आमदार देसाई हे कमळाच्या प्रेमात पडणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमातुन पाटणचे विद्यमान आमदार शंभुराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील दऱ्या-खोऱ्यातील, वाडी-वस्तीवरील आबालवृध्दांची आपल्यामागे असलेली ताकद दाखवुन मतदारसंघातील करिष्मा कायम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवुन दिले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहुन मुख्यमंत्र्यांनीही शंभुराज देसाईंच्या कामाचे कौतुक करुन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याची घोषणा केली. खासदार उदयनराजे भोसलेंनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या माध्यमातुन निवडणुकीच्या तोंडावर देसाई गट चार्ज झाल्याचे दिसुन आले.

पाटण विधानसभा मतदार संघात आमदार देसाई व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यातील पारंपारिक लढत राज्यात प्रसिध्द आहे. मध्यंतरी पाटणकर गटाने माजी मंत्री पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला टक्कर म्हणुन कालचा आमदार देसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस, अन्य मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत घेतलेला कार्यक्रम मानला जात आहे. काल त्यांनी नेटके नियोजन करुन जोरदार कार्यक्रम केला. त्याला पाटण तालुक्यातील वाडी-वस्तीवरील आणि दऱ्या-खोऱ्यातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. शताब्दी स्मारकाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस, खासदार भोसले, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार देसाई यांच्या कामकाज पध्दतीचे विवेचन करुन त्यांच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.

सर्व क्षमता असतानाही काँग्रेसच्या सरकारने लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्री पदापासुन वंचीत ठेवले असा आरोप करुन आमदार देसाई यांनी शताब्दी स्मारकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नसल्याचेही जाहीर सभेत सांगितले. तोच धागा पकडुन मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली त्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करण्यासाठी इतका वेळ लागण्याची आवश्यकताच नव्हती असे सांगुन लोकनेत्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत शंभुराज देसाईंनी केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक करुन त्यांची पाठराखण केली.

शंभुराज देसाई हे शिवसेनेचे आमदार असून त्यांनी यापुर्वीच्या निवडणुका शिवसेनेतुन लढवल्या आहेत. त्यांना खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दौलतनगर येथे जाऊन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन लालदिव्याची गाडी दिली होती. त्यामुळे आमदार देसाई यांची सेनेवरील निष्ठा कायम आहे. मात्र, अलिकडे युती सरकारमधील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक वाढली आहे. त्यातून पाटणला मुख्यमंत्री फडणवीस यांची दौरे ही वाढले आहेत. त्यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघात झालेले कार्यक्रम पाहुन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीखातर आमदार देसाई हे भाजपमधुन निवडणुक लढवतील की काय ? याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com