कोयनातल्या बोटिंगला 'गृह'कडूनच खीळ

कोयना धरणातील शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बोटिंगच्या परवानगीसाठी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध असून, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रश्‍नी लक्ष घालणे गरजेचे आहे
Will Shambhuraj Desai Look into Koyana Boating Issue
Will Shambhuraj Desai Look into Koyana Boating Issue

कोयनानगर : कोयना धरणातील शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बोटिंगच्या परवानगीसाठी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध असून, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रश्‍नी लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यानंतरच कोयनेतील अनेक वर्षे कागदावरच तरंगणाऱ्या बोटिंगला ग्रीन सिग्नल मिळण्याची आशा आहे.

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात अनेक वर्षांपासून बोटिंग बंद आहे. त्यामुळे पर्यटनासह स्थानिकांच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम झाला आहे. पाच वर्षांपासून बोटिंग चालू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हवाई व प्रत्यक्ष पहाणी करून बोटिंगसाठी जागा निश्‍चिती केली होती. धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू करण्यासाठी वन्यजीव, जलसंपदा, गृहमंत्रालय यांची परवानगी आवश्‍यक आहे. 

तिन्ही विभागांत ताळमेळ नसल्याने आजपर्यंत बोटिंगला ग्रीन सिग्नल मिळत नव्हता. वन्यजीव विभागाने जलाशयात बोटिंग सुरू करायला ना हरकत दिली आहे. जलसंपदा विभागाचीही धरणाच्या भिंतीपासून सात किलोमीटरपासून पुढे ना हरकत आहे. बोटिंग चालू करायला गृह विभागाकडूनच परवानगी मिळत नाही. त्याबाबत गृहराज्यमंत्री देसाई यांनी माहिती घेतली आहे. धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटरवर बोटिंग चालू करायला गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनुकूल नाहीत, तर जलसंपदा विभाग धरणाच्या भिंतीपासून सात किलो मीटरपासून पुढे अनुकूल आहे. त्यामुळे मंत्री देसाई यांनी त्यात गांभीर्याने लक्ष घालून प्रश्‍न मार्गी लागवण्याची गरज आहे.

कोयना धरणातील शिवसागरमधील बोटिंगबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात लवकरच बैठक होईल. त्यानंतर तो प्रश्न सोडवण्यात येईल. धरणाच्या जलाशयात बोटिंग निश्‍चितपणे सुरू केले जाईल -शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com