सावंतवाडी भाजप तालुकाध्यक्ष केसरकारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार ?

दारू धंद्यावरून तालुक्‍यात गावागावात सुरू असलेले वाद विवाद लक्षात घेता येत्या महिन्याभरात संबंधित दारूविक्री बरोबर मटका, जुगार पोलिसांनी बंद करावा, अन्यथा एक हजार कार्यकर्त्यांना घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन छेडणार, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिला.
सावंतवाडी भाजप तालुकाध्यक्ष केसरकारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार ?

सावंतवाडी : दारू धंद्यावरून तालुक्‍यात गावागावात सुरू असलेले वाद विवाद लक्षात घेता येत्या महिन्याभरात संबंधित दारूविक्री बरोबर मटका, जुगार पोलिसांनी बंद करावा, अन्यथा एक हजार कार्यकर्त्यांना घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन छेडणार, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिला.

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर श्री. सारंग यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दादू कविटकर, नगरसेवक मनोज नाईक, अमित परब आदी उपस्थित होते. 

सारंग म्हणाले, ""तालुक्‍यातील आंबेगावमध्ये दोन महिन्यांपासून दारूविक्रीवरून वाद आहेत. हे वाद फक्त आंबेगाव पुरती मर्यादित नसून सावंतवाडी तालुक्‍यातील गावागावांत आहेत. गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या पोलिस यंत्रणेचे अजिबात नियंत्रण नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातीलच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून दारू बंदीसाठी आंदोलन करावे लागत असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी भाजप नेहमीच असेल.''

ते म्हणाले, ""दारू धंदे याबरोबरच मटके, जुगार धंदे जोरात सुरू आहेत. अवैद्य धंद्याला लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. 15 ऑगस्ट पर्यंत हे धंदे बंद न झाल्यास गावागावातील महिला पदाधिकारी तसेच एक हजार कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल. तसे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. या आंदोलनाला तालुक्‍यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे.''

आंबेगावचा सरपंच भाजपाचाच
आंबेगाव सरपंच दिव्या आंगचेकर यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आहे; मात्र लवकरच तेथे होणाऱ्या निवडणुकीत बहूमताने भाजपचाच सरपंच बसणार आहे, असे तालुकाध्यक्ष सारंग यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com