संजय काकडे पुन्हा राज्यसभेत दिसणार का?

...
संजय काकडे पुन्हा राज्यसभेत दिसणार का?

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देणारे भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे हे परत राज्यसभेत जाणार का, याची आता उत्सुकता आहे. पवारांना पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणे अवघड होईल, असा इशारा तेव्हा काकडे यांनी दिला होता. त्याच काकडे यांची जागा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातून निवडून द्यावयच्या राज्यसभेतील सात जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत. यात हुसेन उमर दलवाई - कॉंग्रेस, अमर  कांबळे - भाजप,  श्री. राजकुमार नंदलाल धूत - शिवसेना, शरद पवार - राष्ट्रवादी कॉंग्रेस,  माजिद मेमन - राष्ट्रवादी कॉंग्रेस, श्री. रामदास आठवले - आरपीआय (आठवले गट) आणि संजय काकडे (भाजप सहयोगी) यांचा समावेश आहे.

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार. राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजप आपले तीन तर महाविकास आघाडी आपले चार उमेदवार निवडून आणू शकते.  महाराष्ट्रात सध्या भाजपचे 105 आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. 

काकडे हे 2014 मध्ये अपक्षांच्या पाठिंब्याने राज्यसभेवर गेले होते. त्या आधी झालेल्या निवडणुकीत त्यांना पवारांच्या आग्रहामुळे अर्ज मागे घ्यावा लागला होता. आता भाजपकडून छत्रपती उदयनराजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नावे अंतिम असल्याचे सांगण्यात येते. तिसऱ्या नावासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com