शेतकरी आत्महत्येच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : विखे पाटील (व्हिडिओ)

छावणीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.
शेतकरी आत्महत्येच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : विखे पाटील (व्हिडिओ)

नगर :  छावणीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

घोसपुरी (ता. नगर) येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर (वय ४९) यांनी आज पहाटे विषारी आैषध घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला. शिवसेनेच्या नेते संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शवविच्छेदनगृहाजवळ ठिय्या आंदोलन करीत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शासकीय रुग्णालयात विखे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच या प्रकरणाची तहसीलदारांना बोलावून प्राथमिक चौकशी केली. चौकशीतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ''गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी करायचा नाही, असा आंदोलकांनी निर्णय घेतला. आम्ही शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची चर्चा केली आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा झाला, ही वस्तुस्थिती आहे. एव्हढी मोठी घटना घडूनही जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाण्याची आवश्यकता होती, मात्र कुणीही तेथे गेले नाहीत. उलट त्या शेतकऱ्याला गाया किती, शेळ्या किती अशी चाैकशी करून विसंगत उत्तरे दिली जात आहेत. छावण्या बंद झाल्या त्यावेळी शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेतकरी जातो, तेथे गुन्हे दाखल होतात, त्यांना अटक होते, ही बाब भूषणावह नाही. अधिकाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याची गरज होती, तसे मात्र झाली नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर दिरंगाई झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची विनंती करणार आहोत. तसेच आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करणार आहोत.'' 

पाऊस पडेपर्य़ंत छावण्या सुरू 
''ज्या भागात पाऊस नाही, त्या भागात आजही छावण्या सुरू आहेत. चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश सरकारचे आहेत. परंतु त्यामध्ये काही अधिकाऱ्यांकडून शासनाच्या निर्णयाची अवहेलना होत असेल, शेतकऱ्यांना त्रास देण्याची भावना असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ३१ जुलैनंतरही छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश होते, म्हणजे ती काही अंतीम तारीख नव्हती. आजही राज्यात १३ लाखांवर जनावरे सांभाळण्याचे काम या सरकारने केले आहे. एकाही छावणीबद्दल विशेष मोठी तक्रार नाही. शेतकऱ्यांनी संयम पाळून चांगले सहकार्य केलेले आहे. नियमांची अंमलबजावणी केली आहे. अशा घटना घडतात, हे दुर्दव्य आहे. चौकशीत जे काही समोर येईल, त्याबाबत संबंधितांवर कारवाई होणार आहे,'' असे विखे पाटील यांनी सांगितले.  

मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत देणार
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून भरीव मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com