पिंपरी-चिंचवडला मंत्री नाही, राज्यमंत्री दर्जाचे पद तरी मिळणार का?

महामंडळ नियुक्त्या रद्द करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या निर्णयाचा फटका पिंपरी-चिंचवडला बसला आहे. त्यामुळे शहराचे दोन लाल दिवे (राज्यमंत्रीपद दर्जाची पदे)गेले.तर पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपदही त्यामुळे रिक्त झाले आहे.
पिंपरी-चिंचवडला मंत्री नाही, राज्यमंत्री दर्जाचे पद तरी मिळणार का?

पिंपरीः महामंडळ नियुक्त्या रद्द करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या निर्णयाचा फटका पिंपरी-चिंचवडला बसला आहे. त्यामुळे शहराचे दोन लाल दिवे (राज्यमंत्रीपद दर्जाची पदे)गेले.तर पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपदही त्यामुळे रिक्त झाले आहे.

युतीच्या राजवटीत शहराला मंत्रीपदाचे गाजरच मिळाले.मात्र, ही कसर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेली दोन पदे मिळाल्याने काहीशी भरून निघाली होती. राज्य लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी शहरातील अॅड. सचिन पटवर्धन,तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे या दोन भाजप पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील गोरखेंची नेमणूक औटघटकेची ठरली.कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान ती झाली होती. त्यानंतर पाचच महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यात त्यांची मोटार जमा केली गेली. सत्ता परिवर्तन झाल्याने ती परत मिळालीच नव्हती. 

दुसरीकडे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कै. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक सदाशिव खाडे यांची नियुक्ती झाली होती. ,सत्ताबदल होताच या तिघांनीही राजीनामा देणे अपेक्षित होते.पण तो त्यांनी दिला नव्हता. दरम्यान,काल महामंडळ नियुक्त्याच नव्या सरकारने रद्द केल्याने या तिघांचीही पदे आता जाणार आहे.

दरम्यान,पटवर्धन व गोरखे यांच्या जागी पुन्हा शहरातील कुणाची नियुक्ती होण्याची शक्यता कमी असल्चाचे जाणकारांचे म्हणणे आहे.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपदी,मात्र शहरातील व्यक्तीकडेच राहणार आहे. हे पद राष्ट्र्वादीकडे जाण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच मोर्चेंबांधणी सुरु केली आहे.दुसरीकडे शिवसेना आणि कॉंग्रेसचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यासाठी कंबर कसली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com