Will Phadanvis be the next Defence Minister? | Sarkarnama

फडणवीस केंद्रात जाणार?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मार्च 2017

देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या विश्‍वासातील आहेत. फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. प्रतिमा व कामगिरी या दोन्ही बाजूंनी फडणवीस उजवी असल्याने केंद्रात जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर -  मनोहर पर्रीकर यांची गोवाच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर संरक्षण मंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा गोवा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. यामुळे आता संरक्षण मंत्रीपद रिक्त झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्‍वासातील व्यक्तीची निवड होणार हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या विश्‍वासातील आहेत. फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. प्रतिमा व कामगिरी या दोन्ही बाजूंनी फडणवीस उजवी असल्याने केंद्रात जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जागी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड होण्याची चर्चा आहे. सध्या चंद्रकांत पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विश्‍वासातील आहेत. या बदलाची केवळ चर्चाच असून याचर्चेला अधिकृत दुजोरा पक्षाच्या सूत्रांनी दिलेला नाही. गेल्या अडीच वर्षात फडणवीस यांची कामगिरी चांगली असल्याने त्यांना बदलण्याची जोखीम पक्षश्रेष्ठी घेणार नाहीत, असाही एक प्रवाद आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख