पार्थ पवार आता झेडपीच्या राजकारणात उतरणार का?

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक होऊ घातल्याने पुन्हा नव्याने सुरवातकरण्याची संधी पार्थ पवार यांना मिळाली आहे.
will parth pawar join zp politics?
will parth pawar join zp politics?

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे आपली पुढील राजकीय इनिंग हे जिल्हा परिषदेपासून सुरू करणार का, याची आता उत्सुकता आहे. कारण रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर त्यांचा पुणे जिल्ह्यातील शिर्सुफळ-गुणवडी हा मतदारसंघ रिक्त झाला आहे.

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे. पार्थ यांनी थेट मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यांना त्यात अपयश आले. आता या घरच्या मतदारसंघातून राजकीय यश मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील असणार की थेट आमदार, खासदार होण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल. पार्थ यांच्याशिवाय पवार कुटुंबातील आणखी कोणी तरुण सदस्य राजकाणात या निमित्ताने उतरणार का, हे पण कळू शकेल.

खुद्द अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून केली होती. त्यानंतर ते बारामतीतून खासदार झाले. रोहित यांनी नियोजनबद्ध तयारी करत राजकीय कारकिर्द दमदारपणे सुरू केली आहे. तोच कित्ता गिरविण्याची संधी पार्थ यांना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून एक लाख साठ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. 

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमधून आमदार झालेल्यांच्या झेडपी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे.आमदार झालेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच, त्यांचे झेडपी सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यानंतर ही जागा रिक्त होते. या नियमानुसार रोहित पवार यांच्या जिल्हा परिषद गटाची जागा सध्या रिक्त झालेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com