परभणीला मिळणार राहुल पाटलांच्या रुपाने मंत्रीपद?

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ परभणी शहरात आलेल्या पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समोरच येथील हजारो मतदारांनी राहुल पाटल्यांना मंत्री करा अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी तुम्ही मताधिक्य द्या.. मी राहूलचे काय कारायचे आहे ते पाहतो असे म्हणून परभणीकरांना शब्द दिला होता.
Will Parbhani Mla Rahul Patil Get Chance in Maharashtra Cabinet
Will Parbhani Mla Rahul Patil Get Chance in Maharashtra Cabinet

परभणी : युवासेनेचे राज्यातील पहिले आमदार म्हणून 2014 मध्ये निवडून आलेले परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या रुपाने परभणीला ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आमदार राहुल पाटील सलग दुसऱ्यांदा मोठ्या मतधिक्यांनी विजयी झाले आहेत. ठाकरे कुटूंबियांच्या निकटवर्तीयामध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते.

परभणी विधानसभा मतदार संघातून 2014 व 2019 या दोन्ही टर्मला पाटील हे विजयी झालेले आहेत. 2014 मध्ये पाटील यांनी विजय संपादन करून राज्यात युवासेनेचा पहिला आमदार म्हणून मान मिळविलेला आहे. गत पाच वर्षातील त्यांची कारकिर्द वाखानण्याजोगी राहिली. विकास कामांची पावती त्यांना परभणीच्या मतदारांनी 2019 मध्ये दिली. 2019 च्या विधानसभेत आमदार पाटील यांनी 80 हजार मतांची आघाडी घेत विजय संपादन केला आहे. 

त्यांच्या प्रतिस्पर्धांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ परभणी शहरात आलेल्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच येथील हजारो मतदारांनी राहुल पाटल्यांना मंत्री करा अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी तुम्ही मताधिक्य द्या.. मी राहूलचे काय कारायचे आहे ते पाहतो असे म्हणून परभणीकरांना शब्द दिला होता. तो शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आता पूर्ण करतील, अशी अपेक्षा परभणीकरांना वाटते आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com