कार्यालय उद॒घाटन पुढे ढकलले; २७ जानेवारीला पंकजा मुंडे उपोषण करणार का?

येत्या २६ जानेवारीला वरळी (मुंबई) येथील कार्यालयाचे नियोजित उद॒घाटन पुढे ढकलल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर केल्यानुसार ता. २७ जानेवारीला औरंगाबदला उपोषण करणार का, हे पहावे लागणार आहे
Will Pankaja Munde Observe Fast on 27 January
Will Pankaja Munde Observe Fast on 27 January

बीड : भाजपच्या सुकाणू समितीतून बाहेर पडल्याची घोषणा करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरात फिरणार असल्याचे जाहीर करत पंकजा मुंडे यांनी ता. २६ जानेवारीला मुंबईत कार्यालयाचे उद॒घाटन आणि ता. २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचेही घोषीत केले होते. आता कार्यालयाचे उद॒घाटन २६ जानेवारी ऐवजी पाच फेब्रुवारीला होणार असल्याने २७ जानेवारीचे उपोषण त्या करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

परळी मतदार संघातून पराभव झाल्यानंतर ता. १२ डिसेंबरला पंकजा मुंडे परळीजवळील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रथम जिल्ह्यात आणि सार्वजनिक कार्यक्रमात आल्या. यात त्यांनी भाजप नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारे देत पुढील वाटचालीची दिशाही स्पष्ट केली. बंड केले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, वाघीण जंगल सोडून जाणार नाही, अशी गर्जना करत भाजप सुकाणू समिती सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. शेतकरी व सामान्यांसाठी राज्यभर फिरणार असल्याचे जाहीर करुन लोकांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

वरळी (मुंबई) येथील शुभदा बिल्डींगमध्ये असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्यालय नव्याने सुरु करण्यासाठी ता. २६ जानेवारीला त्याचे उद॒घाटनाची घोषणा आणि दुसऱ्या दिवशी ता. २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय उपोषणाची घोषणाही पंकजा मुंडेंनी जयंती कार्यक्रमातच केली होती. मात्र, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर कार्यालयाचे उद॒घाटन २६ जानेवारी ऐवजी पाच फेब्रुवारीला होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे घोषणा केल्यानुसार ता. २७ जानेवारीला औरंगाबादला उपेाषण होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com