will not spare who participated in riot : patil | Sarkarnama

चुकीचे गुन्हे दाखल होणार नाही़ पण; हिंसाचार केला त्यांना सोडणार नाही : SP संदीप पाटील

हरिदास कड
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चाकण : मराठा आंदोलनाच्या निमित्ताने उद्या नऊ आॅगस्टला महामार्गावर खेड तालुक्यात रास्ता रोको आंदोलन न करता शांततेत बंदचे आयोजन करा. मंदिरात भजन करा, निवेदने अधिकाऱ्यांना द्या. मला निवेदने द्या . मी कोठेही निवेदने घ्यायला येईल. याबाबत शासनाला माहीती देईल. पण खेड तालुक्याची ,चाकणची बदनामी होईल असे कृत्य कृपया कोणी करू नये, असे आवागन खेडचे उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथे झालेल्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रांताधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, तीस जुलैला झालेला प्रकार चुकीचा आहे. अशा प्रकाराने चाकण ची बदनामी झाली आहे. असे प्रकार टाळले पाहीजेत. शांततेने बंद झाला पाहीजे.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, तीस जुलैला चाकणला झालेला हिंसाचार हा बाहेरील लोकांनी काही समाजकंटकांनी केलेला आहे. स्थानिक तरूणांकडून हा प्रकार झालेला नाही हे मी पहिलेच स्पष्ट केले आहे. स्थानिक तरूणांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. ज्यांनी हा प्रकार केला त्यांना मात्र सोडले जाणार नाही.

चाकण परिसरात सुमारे साठ टक्के उद्योगांतील गुंतवणूक आहे. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे.त्यामुळे अडीच लाखावर तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. असे हिंसाचाराचे प्रकार झाले तर औद्योगिक वसाहतीत इतर कंपन्या येत नाही. त्यामुळे औद्योगिकरणाला फटका बसतो. ही संतांची, शिवाजी महाराजांची भूमी आहे. यामध्ये असे प्रकार होणे चुकीचे आहे. बंद शांततेत पाळा. पोलिसांचे सहकार्य़ जरूर राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डी .डी. भोसले, कैलास सांडभोर, मनोहर वाडेकर, अप्पासाहेब कड, व्यंकटेश सोरटे आदींनी विचार व्यक्त करून बंद शांततेत पाळला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते , महीला आदी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी चाकणमधील परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याचे सांगितले. चाकण, खेड मधील लोक शांत आहेत. हा प्रकार बाहेरच्यांनी केला आहे. नऊ आॅगस्टचा बंद करताना रास्ता रोको करू नका, असे आवाहन त्यांनी केले.  सूत्रसंचालन गिरीगोसावी यांनी करून उपस्थितांचे आभार उपविभागीय पोलिस अधिकारी टोम्पे यांनी मानले.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख