Will not spare those who ransacked Walunj MIDC | Sarkarnama

वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही - चिरंजीव प्रसाद

योगेश पायघन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी (ता.9) वाळूज परिसरातील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदभात उद्योजकांच्या शिष्टमंडळ शनिवारी (ता 11) पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले. त्यात मराठा उद्योजकांच्या कंपन्यांचेही नुकसान झाले. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्या व हे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन व्हायला पाहिजे. त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिली. 

औरंगाबाद : "वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील गेटच्या डिझाईनला महत्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवाशांवर निर्बंध यावेत यासाठी उद्योजकांना पोलीस सहकार्य करतील," असे आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले. 

महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी (ता.9) वाळूज परिसरातील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदभात उद्योजकांच्या शिष्टमंडळ शनिवारी (ता 11) पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले. त्यात मराठा उद्योजकांच्या कंपन्यांचेही नुकसान झाले. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्या व हे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन व्हायला पाहिजे. त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिली. 

यावेळी सुनील किर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतींगे, अमित राजळे, राहुल घोगरे, कृष्णा गायकवाड, विजयराज शिंदे, कदम, बाबुराव खोडे, सुनील भोसले, विंग कमांडर जाधव, नारायण पवार आदींचा शिष्टमंडळात सहभाग होता.

आयुक्त म्हणाले..
►कंपनीच्या सुरक्षेवर भर देण्याचा द्या
►औद्योगिक वसाहतीत प्रवेशव्दारावरच नियंत्रण गरजेचे
►कंपनीत गेटकीपर पेक्षा तगडे सुरक्षा रक्षक नेमा
►केवळ सुरक्षारक्षक एजन्सीच्या भरवशावर न राहता लायक व्यक्ती सुरक्षेसाठी निवडा
►प्रॉपर्टी संरक्षणाचा प्रत्येकाला हक्क त्याचा वापर करा
►तपास नव्या पोलीस उपायुक्तांकडे
►औद्योगिक वसाहतींच्या नव्याने सुरक्षा उपयोजना करा
►पोलिसांचे मन्यष्यबळ सुरक्षेसाठी देऊ

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख