Will Not Spare Any one in Nashik Atrocity Case Say Justice Thool | Sarkarnama

नाशिक अत्याचारात कोणी राजकीय असले तरी गय नाही : न्या. थूल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नाशिक शहरानजिक एका भाजप नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवासाच्या कार्यक्रमात 'डिजे' वादकांना अमानुष मारहाण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या गंभीर प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे

नाशिक : "नाशिकला भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर घडलेले अत्याचाराचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. येत्या तीन दिवसांत त्याची कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात कोणा राजकीय गटाचा हात असला तरी त्याची गय केली जाणार नाही.'' असे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी स्पष्ट केले.

नाशिक शहरानजिक एका भाजप नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवासाच्या कार्यक्रमात 'डिजे' वादकांना अमानुष मारहाण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या गंभीर प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. त्याबाबत पिडीताच्या नातेवाईकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिस कारवाईविषयी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन न्यायमूर्ती थूल यांनी आज नाशिकला पिडीतांची भेट घेतली. त्यांची विचारपुस केली. जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या उपचाराची माहिती घेतली. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना विविध सुचना केल्या.

यासंदर्भात ते म्हणाले, ''पोलिसांशी चर्चा केल्यावर अद्याप कोणाचाही राजकीय हस्तक्षेप समोर आला नाही. मात्र, तसे असले तरी कोणाचीही गय केली जाणार नाही. हे प्रकरण अतिशय संतापजनक व गंभीर आहे. यात सुरुवातीला नऊ आरोपी होते. आता ती संख्या बारा झाली आहे. यातील अकरा जणांना अटक झाली आहे. पिडीतांच्या जीवाला धोका होईल अशा पध्दतीने त्यांना शॉक देत मारहाण झाली. सर्व कायेदशीर प्रक्रीया पुर्ण तीन दिवसांत पूर्ण करावी जेणेकरुन त्यानंतर कोणाचेही जबाब बदलुन आरोपींना फायदा मिळू नये. यात अभ्यासू व जाणकार वकिल दिला जाईल.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख