मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रश्‍नच नाही- राजेश टोपे 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी शिवसेना-भाजपकडे इनकमिंग सुरू झाले आहे. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता चित्रा वाघ यांनी देखील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे. यातच मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे एक मोठे नाव चर्चेत आले आहे, ते म्हणजे राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रश्‍नच नाही- राजेश टोपे 

औरंगाबाद : कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी शिवसेना-भाजपकडे इनकमिंग सुरू झाले आहे. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता चित्रा वाघ यांनी देखील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे. यातच मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे एक मोठे नाव चर्चेत आले आहे, ते म्हणजे राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे. मात्र 'मी राष्ट्रवादी' पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच नाही' असे म्हणत टोपे यांनी या सगळ्या वावड्या असल्याचे स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून राजेश टोपे ओळखले जातात. आघाडी सरकारमध्ये टोपे यांच्यावर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण सारख्या महत्वाच्या खात्याची जबादारी सोपवण्यात आली होती. जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढवण्यात टोपे यांचा मोठा वाटा आहे. गेली अनेक वर्ष ते पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत असतांनाच राज्यातील पक्षांतराच्या लाटेत टोपे यांचे नाव पुढे आले. राजेश टोपे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार, या चर्चांना गेल्या दोन दिवसांपासून उधाण आले आहे. प्रसार माध्यमांवर टोपे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उत आल्यानंतर अखेर टोपे यांनी यावर खुलासा केला. राजेश टोपे यांच्या काकूंचे निधन झाल्यामुळे ते सध्या आपल्या पाथरवाला ता. अंबड या मुळगावी मुक्कामी आहेत.

राजकारणात सर्वच पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांचे त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे सांत्वनासाठी अनेकांनी त्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या कारणावरूनच टोपे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना सुरूवात झाल्याचे बोलले जाते. कॉंग्रेसचे माजीमंत्री शंकरराव राख यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी टोपे काल जालन्यात आले होते. राज्य पातळीवर राष्ट्रवादीतून शिवसेना-भाजपमध्ये जाणाऱ्या बड्या पदाधिकाऱ्यांच्या घटनेमुळे टोपे यांच्या प्रवेशाचीही चर्चा सुरू झाल्यामुळे टोपे यांनी लगोलग त्याचे खंडण करत खुलासा केला 

टोपे म्हणाले, ''मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही, पक्ष प्रवेशासाठी मी कुणालाही भेटलेलो देखील नाही. त्यामुळे माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या येणाऱ्या बातम्या या निव्वळ अफवा आणि खोट्या आहेत. मी राष्ट्रवादी पक्ष कधीही सोडणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com