Will not Campaign against Sujay Vikhe Says Radhakrishna Vikhe | Sarkarnama

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मी नाराज : सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही - विखे

रामनाथ दवणे
गुरुवार, 14 मार्च 2019

"शरद पवार यांनी आमच्या वडिलांबाबत केलेले विधान अतिशय चुकीचे होते. 1991 च्या घटने नंतर असे शरद पवार यांनी विधान केल्याची मला खंत आहे. आजोबांसंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे सुजय विखे पाटील दुखावले गेले," असे सांगत नगरमध्ये सुजय यांच्याविरोधात आपण प्रचार करणार नाही, असे काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई : "शरद पवार यांनी आमच्या वडिलांबाबत केलेले विधान अतिशय चुकीचे होते. 1991 च्या घटने नंतर असे शरद पवार यांनी विधान केल्याची मला खंत आहे. आजोबांसंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे सुजय विखे पाटील दुखावले गेले," असे सांगत नगरमध्ये सुजय यांच्याविरोधात आपण प्रचार करणार नाही, असे काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर प्रथमच विखे यांनी आपले मौन सोडले. ते म्हणाले, "दोन्ही पक्ष एकत्रीत निडवणुका लढवत असतांना शरद पवार यांनी केलेले विधान हे त्यांचे व्यक्तीश: आहे का हा प्रश्न आहे.. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मी दुखावलो गेलो आहे. मी सुजय विरोधात नगर मध्ये प्रचार करणार नाही. शरद पवार यांनी जे आमच्या वडिलांबाबत विधान केले आहे त्यामुळ मी प्रचार करणार नाही. पक्ष श्रेष्ठींकडे माझ्या दिवंगत वडिलांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा करणार आहे,"

ते म्हणाले, "गेल्या दोन दिवसांच्या घटना पहिल्या माध्यमांमधून जे काही सांगितले जात आहे त्यावर मी दोन दिवसांनी भाष्य करण्याचे ठरवले होते.मीडिया ने बॅलन्स भूमिका मांडल्या मीडियाचा मी आभारी आहे. माझ्या मुलासाठी संघर्ष उभा राहिला असे काही सांगत आहेत हे चुकीचे आहे. काही जागांची मागणी काँग्रेस न  केली होती त्यात नगर च्या जागेचा समावेश होता. राष्ट्रवादीचा मागील नगर मध्ये झालेला पराभव पाहता आम्ही काँग्रेसला ही जागा द्यावी अशी मागणी केली होती. आमचा प्रयत्न होता योग्य समन्वय साधण्याचा. जागा वाटपाच्या चर्चेत माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावे याविषयी माझ्यासोबत चर्चा झाली नव्हती."

"नगर मध्ये मी प्रचाराला जाण्याचा प्रश्नच नाही. माझ्या विषयी कोणी पक्षातील बोलत असतील तर ते पक्षापेक्षा मोठे नाहीत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे काय कुठून आले, ते ही मी समोर आणेनच. बाळासाहेब थोरात यांच्याकडे कपबशी, नारळ, रोलर कठून आले हे मला माहित आहे. त्यांनी मला पक्ष निष्ठा सांगू नये. पक्ष श्रेष्ठीनी माझा कुठलाही खुलासा मागविलेला नाहीश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल. निवडणुकांवर याचा परिणाम होणार नाही," असेही विखे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख