Will NCP withdraw support of Paricharak | Sarkarnama

आमदार प्रशांत परिचारकांवर "दूधपंढरी" अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीची कृपा राष्ट्रवादी परिचारकांचा पाठींबा काढणार का ?

ब्रह्मदेव चट्टे :सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 मार्च 2017

आता प्रशांत परिचारक यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस "दूध पंढरी" बाबत काय करणार हे पहावे लागणार आहे. 

मुंबई: सैनिकांच्या पत्नीसंबंधी वादग्रस्त विधान करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचार यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यासाठी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धरले होते

. मात्र, राष्ट्रवादीच्या मदतीने "दुध पंढरी' नावाने ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत परिचारक विराजमान आहेत. यामुळे सोईचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दुट्टपीपण उघड झाला आहे. यामुळे आमदार परिचारकाच्या निलंबनाची मागणी लावून धरत विधान परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद पाडणाऱ्या राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आमदार प्रशांत परिचारक हे पुर्वीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूक पंढरपूर मतदार संघातून परिचारक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लढवली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला होता.

"प्रशांत परिचारक यांचे वक्तव्य सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी', अशी मागणी परिचारक यांनी सैनिकांबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली होती. त्यामुळे आता प्रशांत परिचारक यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस "दूध पंढरी" बाबत काय करणार हे पहावे लागणार आहे. 

आमदार सुनिल तटकरे, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 

मला याबाबत जास्त माहित नाही. आम्ही निलंबनाची पहिली लढाई जिकली आहे. त्यांचे कायमचेच निलंबन व्हावे यासाठी आम्ही आग्रही आहोत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राज्याचा अध्यक्ष आहे. तरी मला प्रत्येक जिल्ह्याची माहिती असेलच असे नाही. त्यामुळे माहिती घेवून भूमिका स्पष्ट करतो. 
 

आमदार प्रशांत परिचारक यांना सहकार्य केलेले संचालक 

- मनोहर डोंगरे (राष्ट्रवादी ) 
- प्रशांत परिचारक ( त्यावेळी राष्ट्रवादी ) 
- शंभूराजे मोरे ( राष्ट्रवादी ) 
- संजय शिंदे ( त्यावेळी राष्ट्रवादी ) 
- योगेश सोपल (राष्ट्रवादी) 
- दिपक माळी (राष्ट्रवादी) 
- दिलीप माने कॉंग्रेस 
- सौ. गलांडे (राष्ट्रवादी) 
- राजे भोसले (राष्ट्रवादी) 
- मारूती लवटे ( शेकाप ) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख