आमदार बबनदादा शिंदे, दिलीप सोपल यांच्या जागी राष्ट्रवादीचे नवे चेहरे कोण ?

लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य व तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील माढा व बार्शी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार 25 ते 30 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन्ही मतदारसंघात आता नवीन चेहरे येणार की निवडून येण्याचा निकष या मुद्‌द्‌यावर विद्यमान आमदारांनाच संधी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार बबनदादा शिंदे, दिलीप सोपल यांच्या जागी राष्ट्रवादीचे नवे चेहरे कोण ?

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य व तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील माढा व बार्शी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार 25 ते 30 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन्ही मतदारसंघात आता नवीन चेहरे येणार की निवडून येण्याचा निकष या मुद्‌द्‌यावर विद्यमान आमदारांनाच संधी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे विरोधकांच्या मतविभागाणीत आजपर्यंत निवडून आले आहेत. आगामी विधानसभेसाठी या दोन्ही मतदारसंघातून तरुण चेहरे द्यायचे धाडस पक्ष दाखविणार का? याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाल्या आहेत. 
आमदार सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसे झाल्यास या मतदारसंघातून राष्ट्रवादीला तरुण उमेदवार देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. माढ्यातून आमदार शिंदे नसतील तर त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

सोलापुरात एक मतदारसंघ मिळण्याची शक्‍यता 

सोलापूर शहरातील सोलापूर दक्षिण, शहर उत्तर, शहर मध्य या तिन्ही मतदारसंघांत कॉंग्रेस लढते. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीतून या तिन्हीपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शहर मध्यमध्ये कॉंग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने व सोलापूर दक्षिणमध्ये कॉंग्रेसचे जाळे असल्याने हे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहण्याची शक्‍यता आहे. शहर उत्तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी लढवते या जागा 

2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्र लढविली होती. यापूर्वी 2004 व 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ या मतदारसंघातून राष्ट्रवादी लढण्याची शक्‍यता आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ दोन्ही आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. 2014 मध्ये अपक्ष आमदार भारत भालके यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा मतदारसंघ सध्या कॉंग्रेसकडे आहे. आमदार भालके यांनी कॉंग्रेस सोडल्यास या मतदारसंघावर राष्ट्रवादी पुन्हा दावा करू शकते. आघाडीतील मित्रपक्ष म्हणून सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला राहण्याची शक्‍यता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com