नवनित राणा भाजपात जाण्याच्या पुन्हा चर्चा

अमरावतीच्या खासदार नवनित राणा भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतही निवडून आल्यावर त्या भाजपात जातील, अशा चर्चांनी जोर धरला होता. पण खासदार झाल्यावर या चर्चांना स्वल्पविराम लागला होता.
नवनित राणा भाजपात जाण्याच्या पुन्हा चर्चा

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनित राणा भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीतही निवडून आल्यावर त्या भाजपात जातील, अशा चर्चांनी जोर धरला होता. पण खासदार झाल्यावर या चर्चांना स्वल्पविराम लागला होता. सद्यस्थितीत नवनित भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चां नव्याने होऊ लागल्या आहेत. त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी तसे संकेत दिल्याचे सुत्रांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना बळ मिळतेय, असेही काहींचे म्हणणे आहे. नेहमी 'सत्तेसोबत राहणारे', अशीच राणांची ओळख आहे. बडनेरा विधानसभा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रभावशाली कामगिरी करण्यासाठी आणि आगामी निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना सत्तेसोबत जावेच लागेल, त्यामुळे आज नाही तर उद्या राणा भाजपमध्ये जातीलच, असेही सांगितले जाते. पण लोकसभेत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे सध्या त्यांचा भाजपप्रवेश सहज होणार नसल्याचेही काही जाणकार सांगतात. या चर्चांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी आमदार रवी राणा यांना फोन केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com