नवी मुंबईच्या आजी-माजी नगरसेवकांचा विमा वादात

पालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांना आरोग्य विमा मिळावा. यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाला तसा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे पालिकेला लाखो रुपयेचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे
Will Navi Mumbai Corporators get Insurance Cover
Will Navi Mumbai Corporators get Insurance Cover

तुर्भे :  पालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांना आरोग्य विमा मिळावा. यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाला तसा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे पालिकेला लाखो रुपयेचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेवकाना आरोग्य विमा देऊ नये, महापौरांनी दिलेले आदेश रद्द करावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांचा आरोग्य विम्याचा प्रश्न आता राज्यस्तरावर गेल्याने वादग्रस्त होण्याची शक्‍यता आहे.

नवी मुंबईतील 95 टक्के आजी माजी नगरसेवक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. ते आपले स्वतःचा विमा स्वतः काढू शकतात. तितकी त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. नव्याने निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे चारचाकी, घर स्वतःचे येते. तसेच बऱ्याच नगरसेवकांची संपत्ती, फार्म हाऊस सुद्धा आहे. असे असतानाही पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा जो प्रयत्न चालू आहे. तो योग्य आहे का? असा सवाल गोविंद साळुंखे यांनी निवेदनाद्‌वारे उपस्थित केला आहे. 

सद्यस्थितीत पालिकेची चार रुग्णालये आहेत. या रुग्णालयांच्या इमारती अवाढव्य असल्या तरी, आरोग्य सेवा कोमात गेली आहे. या आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष करून जनतेच्या पैशावर उपचार घेण्यासाठी विमा काढण्याची गरजच काय? असा संतप्त सवालही साळुंखे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, विम्याचा प्रस्ताव आल्यास तो रद्द केला नाहीतर उपोषण करण्याचा इशारा देखील साळुंखे यांनी यावेळी दिला आहे. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

विधानसभा, विधानपरिषदेमधील आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्याचे असणारे प्रस्ताव मंजूर करून घेतात. त्याच पद्धतीने नवी मुंबईतील आजी-माजी नगरसेवक, पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात वाकबगार आहेत. मात्र, त्यांची ही योजना यशस्वी होऊ देणार नाही - गोविंद साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com