नाशिकमधून डॉ. राहुल आहेरांची होणार मंत्रीमंडळात एंट्री?

गतवेळी डॉ. राहूल आहेर यांची मंत्रीमंडळातील संधी हुकली. मात्र यंदाच्या व्हायरल झालेल्या संभाव्य मंत्रीमंडळातील यादीत दुसऱ्यांदा विधानसभेतपोहोचलेले डॉ. राहुल आहेर यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. यानिमित्ताने नाशिकला प्रदीर्घ काळानंतर मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याने त्याची उत्सुकता वाढली आहे.
Nashik Dr. Rahul Aher with Cm Devendra Fadanavis
Nashik Dr. Rahul Aher with Cm Devendra Fadanavis

नाशिक : जिल्ह्यातील बहुजन समाज आणि शहर व ग्रामीण भागाचा प्रतिनिधीक चेहरा म्हणून गतवेळी डॉ. राहूल आहेर यांची मंत्रीमंडळातील संधी हुकली. मात्र यंदाच्या व्हायरल झालेल्या संभाव्य मंत्रीमंडळातील यादीत दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेले डॉ. राहुल आहेर यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. यानिमित्ताने नाशिकला प्रदीर्घ काळानंतर मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याने त्याची उत्सुकता वाढली आहे.

जिल्ह्यात 2014 मध्ये भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात पाचवर गेल्या आहेत. यामध्ये सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि डॉ. राहुल आहेर दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तर राहुल ढिकले आणि दिलीप बोरसे हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत. गतवेळी नाशिकला मंत्रीमंडळात स्थान नव्हते. शेवटच्या टप्प्यात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारातही अपेक्षाभंग झाला. या कालावधीत अत्यंत प्रतिकुल राजकीय स्थिती व टोकदार झालेल्या भौगोलिक अस्मिता यातून मोठ्या मताधिक्‍याने चादंवड- देवळा मतदारसंघातून डॉ. आहेर निवडून आले आहे. त्यांच्या कुटुंबात भारतीय जनता पक्षाची प्रदीर्घ पार्श्‍वभूमी आहे. 

त्यांचे वडील डॉ. दौलतराव आहेर 1995 ते 1999 या कालावधीत राज्याचे आरोग्यमंत्री होते. त्याआधी त्यांनी भाजपचे आमदार, खासदार म्हणूनही प्रभावी काम केले आहे. दुष्काळ व टंचाईची पार्श्‍वभूमी असलेल्या देवळा- चादंवड मतदारसंघात 'वॉटर कप'च्या माध्यमातून राहुल आहेर यांनी शंभरहून अधिक खेड्यांत काम केले. त्याचे पारितोषिक या मतदारसंघातील गावांना मिळाले. सर्वाधीक निधी व विकासकामे केल्याने मतदारांचा विश्‍वास जिंकल्याने राहुल आहेर यांनी पक्षातील नेते व मंत्र्यांसाठीही चर्चेचा विषय आहेत. त्याचा लाभ त्यांना यंदा पाच आमदार असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या प्रतिनिधीत्वासाठी मंत्रीमंडळात स्थान मिळावे, यासाठी होण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com