आदर्श तालुक्‍यात शिरपूरची निवड होण्यासाठी प्रयत्नशील : अमरिशभाई पटेल

राज्यातील आदर्श तालुक्‍यात शिरपूरची निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकासाच्या विविध क्षेत्रात शिरपूर अग्रेसर आहे. त्यात आणखी उड्डाण घेऊन तालुका विकासाचे मॉडेल म्हणजे शिरपूर, अशी ओळख निर्माण करायची आहे, अशी भूमिका भाजप- शिवसेना महायुतीचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी मांडली.
Kashiram Pawara -  Amrishbhai Patel
Kashiram Pawara - Amrishbhai Patel

शिरपूर (जि. धुळे) : राज्यातील आदर्श तालुक्‍यात शिरपूरची निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकासाच्या विविध क्षेत्रात शिरपूर अग्रेसर आहे. त्यात आणखी उड्डाण घेऊन तालुका विकासाचे मॉडेल म्हणजे शिरपूर, अशी ओळख निर्माण करायची आहे, अशी भूमिका भाजप- शिवसेना महायुतीचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी मांडली.

शिरपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार काशिराम पावरा तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांची भिस्त अमरिशभाई पटेल यांच्यावर आहे. अमरिशभाई, त्यांचे बंधू प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, पुतणे युवा नेते तपन पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, तुषार रंधे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरतसिंह राजपूत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. रॅली, सभांव्दारे प्रचार केला गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही शिरपूर येथे सभा झाली. त्यांनी पक्षीय बंडखोरांना व्यक्तीपेक्षा कमळ महत्त्वाचे आहे हे कळेल, असे सूचक उद्‌गारही काढले होते. यानंतर अमरिशभाईंनी सभांचा धडाका लावला. गेल्या साडेतीन दशकात शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नसह शैक्षणिक, उद्योगांच्या निर्मितीतून रोजगार, शासकीय योजनांचा तळागाळापर्यंत पोहोचविलेला लाभ, आदिवासींसह विविध समाज घटकांच्या प्रगतीसाठी केलेली कामे व योगदानाची मांडणी त्यांनी सभेतून केली. मतदारसंघात अद्ययावत रुग्णालय व विविध सोयीसुविधांची निर्मिती, विकासात शिरपूर तालुक्‍याने आणखी उड्डाण घेण्यासाठी महायुतीला साथ दिली जावी, अशी अपेक्षा अमरिशभाई व पदाधिकाऱ्यांनी सभांमधून मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com