नागपुरच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनाखात्याच्या मंत्र्यांसह होणार अधिवेशन?

महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर करारातील अटींनुसार हिवाळी अधिनेशन नागपुरला घेण्याची सुरुवात केली. तेव्हापासून राज्य सरकार विदर्भातील जनतेसाठी हिवाळ्यात नागपुरला येते. यामध्ये विदर्भाचे प्रश्‍न चर्चीले जाऊन सोडवणूक व्हावी. येथील जनतेला आपल्या सरकारातील मंत्र्यांना भेटता यावे. लोकांना आपल्या सरकारसोबत आपुलकी निर्माण व्हावी, हे उद्देश आहेत.
Nagpur is Ready for Winter Session
Nagpur is Ready for Winter Session

नागपूर : मुंबईच्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, तेव्हापासून अद्यापही या मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही आणि मंत्रीमंडळाचा विस्तारही झालेला नाही. त्यामुळे यावेळी नागपुरच्या इतिहासात पहील्यांदाच बिनखात्याच्या मंत्र्यांसह अधिवेशन होणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर करारातील अटींनुसार हिवाळी अधिनेशन नागपुरला घेण्याची सुरुवात केली. तेव्हापासून राज्य सरकार विदर्भातील जनतेसाठी हिवाळ्यात नागपुरला येते. यामध्ये विदर्भाचे प्रश्‍न चर्चीले जाऊन सोडवणूक व्हावी. येथील जनतेला आपल्या सरकारातील मंत्र्यांना भेटता यावे. लोकांना आपल्या सरकारसोबत आपुलकी निर्माण व्हावी, हे उद्देश आहेत. विदर्भातील लोकांनाही आपल्या मंत्र्यांना भेटायचे असते. त्यांना विविध मागण्यांची निवदेने द्यायची असतात. पण मंत्रीमंडळ विस्तार आणि आहे त्या मंत्र्यांना खातेवाटप न झाल्याने यावेळी लोकांची अडचण होणार आहे, असे दिसते.

सन 2014 मध्ये 14 ऑक्‍टोबरला फडणवीस सरकारचा शपथविधी मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर झाला होता. त्यावेळी त्यांच्या सरकारमधील 8 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत या 8 मंत्र्यांच्या भरवशावरच कारभार सुरु होता. 8 डिसेंबरपासून नागपुरला अधिवेशन सुरु होणार होते. नागपूर अधिवेशनाचे महत्व लक्षात घेऊन तत्कालिन सरकारने 5 डिसेंबरला 20 मंत्र्यांचा शपथविधी केला आणि त्यांना खातेवापही केले. त्यानंतर सर्व मंत्री अधिवेशनात कामकाजासाठी दाखल झाले होते. फडणवीस सरकारने त्यावेळी ही दक्षता घेतली होती. आता उद्धव ठाकरे सरकार असे करणार की बिनखात्याच्या मंत्र्यांसहच कारभार चालवणार, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com