केसरकरांना पुन्हा मंत्रिपदांची संधी? सामंत, जाधव यांचीही नावे चर्चेत

राज्यात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या 28 ला झाला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अटकळ होती. आता प्रतीक्षा संपली असून सोमवारी विस्तार होणार आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी दहा कॅबिनेट, तीन राज्यमंत्री तसेच कॉंग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील. त्यात कोकणातील कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता आहे.
Uday Samant  Bhaskar Jadhav  Deepak Kesarkar Names in Ministerial Race
Uday Samant Bhaskar Jadhav Deepak Kesarkar Names in Ministerial Race

कणकवली : ठाकरे सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीचा मुहूर्त सोमवारी (ता.30) निश्‍चित झाला आहे. या विस्तारात सिंधुदुर्गातून दीपक केसरकर, रत्नागिरीतून उदय सामंत आणि भास्कर जाधव यांना मंत्रिपदाची संधी असल्याचे समजते; मात्र सिंधुदुर्गाच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसणार का याबाबतही उत्सुकता आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या 28 ला झाला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अटकळ होती. आता प्रतीक्षा संपली असून सोमवारी विस्तार होणार आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी दहा कॅबिनेट, तीन राज्यमंत्री तसेच कॉंग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील. त्यात कोकणातील कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता आहे. 

सिंधुदुर्गाचे माजी पालकमंत्री केसरकर तर दोन वेळा निवडून आलेले वैभव नाईक या शिवसेना नेत्यांना संधी मिळणार हाही उत्सुकतेचा विषय आहे. पालकमंत्रिपद कुणाला मिळणार, यावरही चर्चा झडत आहेत. रत्नागिरीतून सामंत आणि जाधव यांना संधी आहे. सिंधुदुर्गातील दोन आणि रत्नागिरीतील चार ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीकडे संदेश निकम एकमेव आमदार आहेत. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीलाही संधी आहे.

राज्यातील नव्या समीकरणानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत राजकीय वातावरण तापले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढा देण्याबाबत निर्णय झाला; पण या निर्णयाला सावंतवाडीत तडा गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या आमदारांसाठी काय संधी देणार याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. या चर्चेला सोमवारी पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.

राणेंना शह देणारा नेता पालकमंत्री

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार नारायण राणे आणि त्यांच्या सर्व समर्थकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सिंधुदुर्गात प्रभावी नेता शिवसेनेकडे सध्यातरी नाही. माजी पालकमंत्री केसरकर यांनी प्रयत्न केले. आता सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री पदी नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

कोकणात शिवसेना वाढवण्याचे आव्हान

पुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविल्या जातील, असे निश्‍चित झाले असले तरी कोकणात शिवसेनेचा पाय खोलवर रुतलेला आहे; मात्र आजवर भाजपच्या साथीने लोकसभेच्या जागेवर शिवसेनेने आपला विजय कायम ठेवला आहे. आत्ता भाजपकडून फारकत घेतल्यानंतर शिवसेनेला आपली पाळेमुळे अजून घट्ट करावी लागणार आहेत. केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विसंबून स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करता येणार नाहीत. त्यामुळे शिवसेना संघटना वाढीच्या दृष्टीने कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हेही स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com